बेळगाव : नोकरीवालाच मुलगा पाहिजे ही मानसिकता बदलायला हवी, असे आवाहन महापौर मंगेश पवार यांनी केले. मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे ओरिएंटल हायस्कूल येथील तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन येथे वधू-वर महामेळाव्यात मंगेश पवार प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, बांधकाम व्यावसायिक अमर अकनोजी, कार्याध्यक्ष …
Read More »बेळगावच्या मयांक हलदर याने दोन सुवर्णपदकांना घातली गवसणी
बेळगाव : चेन्नई येथे संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय एशिया पॅसिफिक डाऊन सिंड्रोम फेडरेशन आयोजित जलतरण स्पर्धेत ज्यामध्ये भारतासह इतर दहा देशातील जलतरपटूंनी भाग घेतला त्यामध्ये बेळगावच्या मयांक हलदर याने भारताचे प्रतिनिधित्व करताना दोन सुवर्णपदकांना गवसणी घातली. त्याने 50 मीटर फ्रीस्टाइल सुवर्णपदक व 25 मीटर बॅक स्ट्रोकमध्ये सुवर्णपदक मिळवून बेळगावचे नाव …
Read More »मराठा समाज सुधारणा मंडळ व हलगा ग्रामस्थांच्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण
बेळगाव : मराठा समाज सुधारणा मंडळ व हलगा ग्रामस्थांच्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित दादा पवार यांच्या निधनामुळे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. रविवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी सायंकाळी आठ वाजता मरगाई मंदिर परिसरात शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या शोकसभेच्या अध्यक्षस्थानी मराठा समाज सुधारणा मंडळाचे …
Read More »दौलतराव पाटील सोशल फाउंडेशनच्या उपक्रमामुळे समाजाला नवी दिशा
माजी मंत्री वीरकुमार पाटील ; स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिरासह कुपनलिकेची खुदाई निपाणी (वार्ता) : येथील दौलत मळा मधील रहिवासी हिमांशू पाटील यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त रूढी, परंपरेला फाटा देऊन रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबिर आणि कूपनलिकेची खुदाई करून समाजाला वेगळी दिशा देऊन दौलतराव पाटील सोशल फाउंडेशनने स्तुत्य उपक्रम राबवला आहे. …
Read More »डॉ. आंबेडकरांच्या विचारांमुळे ‘बळवंतरावां’चे जिल्ह्यात समाजकार्य
साहित्यिक योगीराज बागुल ; वराळे फाउंडेशनतर्फे निपाणीत कार्यक्रम निपाणी (वार्ता) : संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निपाणी शहराला बऱ्याचदा भेटी दिल्या आहेत. या काळात त्यांनी बळवंत वराळे यांच्या निवासस्थानी वास्तविक केले आहे. डॉ. आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित होऊन वराळे यांनी बेळगाव जिल्ह्यात दलित समाजासाठी केलेले कार्य अतुलनीय आहे …
Read More »सीमाप्रश्नाची सोडवणूक हीच अजितदादा यांना श्रद्धांजली ठरेल; खानापूर समितीच्या वतीने अभिवादन
खानापूर : आज खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदादा पवार यांना आदरांजली वाहण्यासाठी राजा शिवछत्रपती स्मारक खानापूर येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला खानापूर तालुका महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, माजी आमदार दिगंबरराव पाटील, सरचिटणीस आबासाहेब दळवी, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, …
Read More »हिंडलग्यातील ब्रह्मलिंगेश्वर मंदिराला दीड लाखाची मदत
श्रीक्षेत्र धर्मस्थळाकडून सहाय्य; देवस्थान पंच कमिटीकडे सुपूर्द हिंडलगा : हिंडलगा येथील प्राचीन व श्रद्धास्थान असलेल्या ब्रह्मलिंगेश्वर मंदिराच्या विकासासाठी श्रीक्षेत्र धर्मस्थळ धर्माधिकारी परमपूज्य डॉ. डी. वीरेंद्र हेगडे यांच्या मान्यतेने १ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. श्रीक्षेत्र धर्मस्थळच्या वतीने हा धनादेश जिल्हा निर्देशक सतीश नाईक आणि बेळगाव जिल्हा …
Read More »निपाणीच्या ‘चपाती भाजी’ महागाईचा भडका!
व्यावसायिक सिलिंडर दरात ११२ रुपयांची वाढ ; व्यावसायिकांसह ग्राहकांच्या खिशाला कात्री निपाणी (वार्ता) : चपाती भाजीसाठी निपाणीतील हॉटेल प्रसिद्ध आहेत. शहरात कोणत्याही कामासाठी आलेली व्यक्ती चपाती भाजी खाऊनच परतते. दूरवरून आलेले पाहुणेही या चपाती भाजीचा आस्वाद घेऊन जातात. महागाईमुळे चपाती भाजी व इतर हटिलिंग पदार्थ महागले आहेत. डिसेंबर २०२५ …
Read More »स्वयंपाक घरातील फोडणी महागली
खाद्यतेलासह शेंगदाण्याचे भाव कडाडले; महिलांचे बजेट कोलमडले निपाणी (वार्ता) : सहा महिन्यांपासून स्थिर असलेले खाद्यतेल आणि शेंगदाण्याचे भाव आता गगनाला भिडले आहेत. निपाणीत १० दिवसांपासून सुरू असलेल्या या दरवाढीमुळे सर्वसामान्य कुटुंबीयांचे बजेट कोलमडले असून, गृहिणींमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. सोयाबीन, सूर्यफूल आणि शेंगदाणा तेलाच्या किमतींत किलोमागे १८ ते २७ …
Read More »सिलिगुडी येथे बेळगावच्या कन्येला बी.एस.एफ. परेड कमांड करण्याचा मान
बेळगाव : पश्चिम बंगाल येथील सिलिगुडी येथे काल दि. 31 जानेवारी रोजी पार पडलेल्या बी.एस.एफ. (सीमा सुरक्षा दल) शपथग्रहण समारंभात बेळगावच्या कन्येने घवघवीत यश संपादन करत जिल्ह्याचा मान उंचावला आहे. मूळची खानापूर तालुक्यातील ओलमणी गावची आणि सध्या शाहूनगर, कंग्राळी (बी.के.) येथे वास्तव्यास असलेली कु. रोशनी वसंत मुळीक हिला या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta