खानापूर : खानापुरात अवैधरित्या वाळूची तस्करी वाढली असून या व्यवसायासाठी विजेचीही बेकायदेशी वापर होत असल्याचे निदर्शनात आले आहे. याकडे हेस्कॉमसह प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी डोळेझाक करत असल्याची तक्रार येथील स्थानिक नागरिकांनी केली आहे. खानापूर नदी पात्रातील, वनक्षेत्रातील, सर्व्हे क्रमांक जमिनीतील वाळूची तस्करी जोरात सुरु असून बेकायदेशीरपणे वीज देखील वापरली …
Read More »रेल्वे रुळावर झोकून देऊन अनोळखीची आत्महत्या
बेळगाव : बेळगाव येथे रेल्वे रुळावर झोकून देऊन अनोळखी व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बेळगाव शहरातील किल्ला तलावाच्या मागील भागात असलेल्या रेल्वे रुळावर मंगळवारी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली. दादरहून हुबळीकडे जाणाऱ्या लोकमान्य एक्सप्रेस रेल्वेखाली झोकून देऊन अनोळखी व्यक्तीने आत्महत्या केली. त्यानंतर मागून येणाऱ्या मिरज रेल्वेच्या चालकाने मृतदेह …
Read More »9 ते 20 डिसेंबर दरम्यान कर्नाटकचे हिवाळी अधिवेशन
बेळगाव : येत्या 9 ते 20 डिसेंबर दरम्यान सुवर्ण विधान सौध येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन होणार असल्याची घोषणा कर्नाटक सरकारने केली आहे. अधिवेशन बोलावण्यासंबंधीचा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्याकडे पाठवण्यात आल्याची पुष्टी कायदा आणि संसदीय कामकाज मंत्रालयाने केली आहे. एक ऐतिहासिक टप्पा म्हणून यंदा सरकार गत 26 व 27 …
Read More »बिम्समधील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे बाळंतीण महिलेचा मृत्यू
बेळगाव : बिम्स डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बेळगाव जिल्हा रुग्णालयात घडली आहे. बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील नागनूर तांडा येथील कल्पना राठोड या मृत महिलेचे नाव आहे. काल रात्री तिने शस्त्रक्रियेद्वारे मुलाला जन्म दिला. आई आणि बाळ निरोगी असून कोणतीही अडचण नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. मात्र मंगळवारी सकाळी …
Read More »विनोद तावडे 5 कोटी घेऊन आले, दोन डायऱ्याही सापडल्याचा आरोप; विरारमध्ये बविआ-भाजपचा राडा
विरार भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी विरारमधील एका हॉटेलात पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडी पक्षाने केला आहे. विनोद तावडे हे विरारमधील एका हॉटेलमध्ये 5 कोटी रुपये घेऊन आले होते. ही गोष्ट बविआच्या कार्यकर्त्यांना समजली तेव्हा त्यांनी हॉटेलवर धाव घेतली. यानंतर हॉटेलमध्ये बविआ आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची …
Read More »म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचे सांस्कृतिक स्पर्धेमध्ये सुयश
खानापूर : मराठा मंडळ संस्था संचलित ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर, हे बेळगाव जिल्ह्यातील एक नामांकित पदवीपूर्व महाविद्यालय म्हणून ओळखले जाते. या महाविद्यालयातील विद्यार्थिनी अभ्यास, कला, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रस्थानी असतात. मराठा मंडळ संस्थेच्या सन्माननीय अध्यक्षा डॉक्टर राजश्रीताई नागराजू (हलगेकर) यांच्या कल्पक मार्गदर्शनाखाली या महाविद्यालयात अनेक लोकोपयोगी उपक्रम …
Read More »आर. एम. चौगुले यांनी केले विजेत्या खेळाडूंचे जल्लोषात स्वागत
मिनी ऑलिम्पिक खो-खो स्पर्धेत बेळगाव विजेता बेळगाव : बंगळूर येथे सुरू असलेल्या मिनी ऑलिम्पिक खो-खो स्पर्धेत बेळगावातील मुलांच्या संघाने अंतिम फेरीत म्हैसूरला नमवित विजेतेपद पटकाविले. या संघाचे आगमन बेळगाव रेल्वेस्थानकावर होताच महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. उपस्थित सर्व खेळाडूंना गुलाबपुष्प आणि …
Read More »विश्वेश्वरय्या नगर परिसरात चोरीच्या प्रकारात वाढ
बेळगाव : बेळगाव शहरात दिवसेंदिवस खून, लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, विश्वेश्वरय्या नगर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वसतिगृहात एकाच महिन्यात पाच घरफोड्या झाल्या असून, स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या महिनाभरात चोरीच्या पाच घटना उघडकीस आल्या आहेत. बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या घरासमोरील घरातून अशा घटना घडल्या तर सामान्य जनतेच्या घरांचे …
Read More »खानापूर पट्टन पंचायतसाठी तिघांची नामनियुक्त नगरसेवक म्हणून नियुक्ती
खानापूर : कर्नाटक सरकारने खानापूर पट्टन पंचायतसाठी तीन जणांना नामनियुक्त नगरसेवक म्हणून नियुक्त केले आहे. याबाबतचा अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे. नामनियुक्त नगरसेवकांची नावे 1. अभिषेक होसमनी, 2. इसाक खान पठान, 3. रूपाली रवी नाईक सदर नियुक्ती बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी तसेच खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसीच्या सचिव …
Read More »खादरवाडी गावच्या जमीन प्रकरणाला नवी कलाटणी
बेळगाव : खादरवाडी गावच्या जमीन प्रकरणाला आता नवी कलाटणी आली आहे. खादरवाडी गावच्या शेतकऱ्यांनी काल गावात निषेध मोर्चा, निदर्शने केल्यामुळे जमीन विकणाऱ्या काही दलाल सदस्यांनी बैठकीमध्ये संपूर्ण गावांसमोर आपले म्हणणे मांडले. यामध्ये त्यांनी हा व्यवहार व या व्यवहाराची रक्कम बुडा कमिशनरने ठरविल्याचे धक्कादायक वक्तव्य केले आहे. त्यामुळे या खादरवाडीच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta