Sunday , September 8 2024
Breaking News

Belgaum Varta

मूलभूत सुविधांसाठी हिरेहट्टीहोळी ग्रामस्थांचे उपोषण; डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या मध्यस्थीने उपोषण मागे

  खानापूर : गावातील मूलभूत सुविधांसाठी हिरेहट्टीहोळी येथे काही ग्रामस्थ व ग्रा. पं. सदस्य गेल्या ३-४ दिवसापासून पंचायती समोर उपोषणाला बसले होते. यासंदर्भात माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांना माहिती मिळताच त्यांनी खानापूरचे तहसिलदार यांना हिरेहट्टीहोळी येथे जाऊन उपोषणा संदर्भात चर्चा करून योग्य तोडगा काढण्यास सांगितले. त्याप्रमाणे आज हिरेहट्टीहोळी येथे …

Read More »

श्री मराठा सौहार्द सहकारी संघाचे निपाणीत उद्घाटन

  निपाणी (वार्ता) : येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्या हस्ते श्री. मराठा सौहार्द सहकारी संघाचे उद्घाटन झाले. काकासाहेब पाटील यांनी, मराठा समाजाने एकत्रित येऊन या संस्थेची स्थापना केली आहे. त्याच्या माध्यमातून सर्वसामान्यांना पत मिळवून देऊन त्यांचे जीवनमान उंचवावे, असे आवाहन केले. सहकार्यारत्न उत्तम पाटील …

Read More »

श्रावण मासातील सत्संगामुळे जीवन सार्थकी

  अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज; समाधी मठात आराधना महोत्सव निपाणी (वार्ता) : श्रावण हा देव, धर्म, व्रतवैकल्य करण्याचा महिना आहे. या काळात महिनाभर प्रवचन कीर्तन असे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यामधून अध्यात्म शांती व मन परिवर्तन होत असते. त्यासाठी प्रत्येकाने या महिन्यात जपनाम, अन्नदान, धार्मिक सेवा केली पाहिजे. या महिन्यातील …

Read More »

गणेशमूर्तीची विटंबना थांबवा

  विविध हिंदू संघटनांची मागणी; तहसीलदारांना निवेदन निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात पर्यावरणाचे महत्त्व सर्वांच्या लक्षात येत आहे. तरीदेखील अनेक विषयांमध्ये प्रशासनाकडून अपेक्षित कृती होत नाही. त्यामुळे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘मूर्तीदान’ आणि ‘कृत्रित तलाव’ यांसारख्या मोहिमा राबवल्या जात आहेत. त्यामुळे एक प्रकारची मूर्तीची विटंबना होत आहे. …

Read More »

सलीम नदाफ यांच्या विज्ञानवारी शनिवारी नवोपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर निवड

  निपाणी (वार्ता) : महाराष्ट्रातील स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशनतर्फे राष्ट्रीय नवोपक्रम स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये निपाणी येथील संभाजीनगर शाळेतील विज्ञान शिक्षक सलीम नदाफ यांच्या ‘विज्ञानावरी शनिवारी’ या नवोपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. पुणे येथील एस. सी.ई.आर.टीच्या सहाय्यक संचालिका शोभा खंदारे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात …

Read More »

गडहिंग्लजच्या ‘नेताजी पालकर’ने फोडली दहीहंडी

  निपाणीत गोविंदांचा थरार; रात्री उशिरापर्यंत गर्दी निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूह आणि येथील चाटे मार्केट मधील व्यापारी मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दहीहंडी कार्यक्रमात ‘गो, गो गोविंदा…’ म्हणत गडहिंग्लज येथील नेताजी पालकर गोविंदा पथकाच्या गोविंदांनी थरावर थर, रचण्याची त्यांची चुरस निपाणीकरांना अनुभवता आली. ही दहीहंडी गडहिंग्लज …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आरती संग्रहाचे प्रकाशन

  बेळगाव : कोरे गल्ली शहापूर यांच्या वतीने गणेश उत्सव निमित्त आरती संग्रह प्रकाशित करण्यात आला. या प्रसंगी मध्यवर्ती म. ए. समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, महादेव पाटील, नेताजी जाधव, कोरे गल्लीचे पंच सोमनाथ कुंडेकर, राजकुमार बोकडे, शिवाजी हावळानाचे व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना श्री. मरगाळे यांनी गणेश उत्सव साजरा करताना कोणती …

Read More »

गोकाक येथील बीर सिद्धेश्वर मंदिर परिसरात भीषण हत्या

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील ममदापूर गावात रात्री भजनाचा कार्यक्रम सुरू असताना एका व्यक्तीचा ऊस तोडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कोयत्याने वार करून खून केल्याची घटना घडली आहे. ममदापूर गावातील बीर सिद्धेश्वर मंदिरात भजनाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रम संपल्यानंतर गच्चीवर झोपलेल्या मद्देप्पा यल्लाप्पा बनासी (४७) यांच्यावर त्याच गावात राहणाऱ्या बीराप्पा …

Read More »

मला “चिंता किंवा तणावग्रस्त” होण्याचे कारणच नाही

  मुख्यमंत्री सिध्दरामय्या; विरोधकांचा दावा फेटाळला बंगळूर : म्हैसूर शहर विकास प्राधिकरण (मुडा) भूखंड वाटप प्रकरणामध्ये राज्यपालांनी खटला चालविण्यास परवानगी दिल्याच्या पार्श्वभूमीवर मला “चिंता किंवा तणावग्रस्त” होण्याचे कारण नाही. मी तशी कोणतीच चूक केलेली नाही, असा त्यांनी दावा केला. त्याऐवजी, ते म्हणाले, विरोधी पक्षांच्या नेत्यांना त्यांनी केलेले खोटे आरोप खरे …

Read More »

बंगळुर कंपनीने मानवरहित बॉम्बर विमानाच्या पहिल्या उड्डाणाची केली घोषणा

  बंगळूर : फ्लाइंग वेज डिफेन्स अँड एरोस्पेस (एफडब्ल्यूडीए) ने मंगळवारी एफडब्ल्यूडी २०० बी या मानवरहित बॉम्बर विमानाच्या यशस्वी उड्डाणाची घोषणा केली. पत्रकारांशी बोलताना, एफडब्ल्यूडीएचे संस्थापक आणि सीईओ सुहास तेजस्कंद म्हणाले की, स्वदेशी बनावटीचे लढाऊ युएव्ही हे संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनाच्या भारताच्या धावपळीतील एक महत्त्वाचा टप्पा होता. यूएव्हीचे पहिले उड्डाण, एका …

Read More »