सांगली : सांगली जिल्ह्यातील तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात यंदा चुरशीची लढत झाली. या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. पण, अखेर या मतदारसंघातील निकाल जाहीर झाला असून राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचा मुलगा रोहित पाटील यांनी बाजी मारली आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभेत आता …
Read More »सोने चोरी करणाऱ्या आरोपींना अटक : यमकनमर्डी पोलिसांची कारवाई
बेळगाव : यमकनमर्डी पोलिसांनी दोन ठिकाणी झालेल्या सोने चोरीच्या घटनांचा उलगडा करत तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत ५५ ग्राम सोने जप्त करण्यात आले आहे. यमकनमर्डी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या सोने चोरीच्या घटनांची उकल केली आहे. हुक्केरी तालुक्यातील इस्लामपूर येथील अडिवेप्पा लागमप्पा बागराई यांचे ३० ग्राम सोने चोरीला गेले …
Read More »26 नोव्हेंबरला महायुतीचे सरकार स्थापन होणार : उद्या नवीन आमदारांची बैठक
मुंबई : महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने सत्तेच्या दिशेने एक पाऊल टाकताच कार्यकर्त्यांच्या जल्लोषाने कळस गाठला. एकनाथ शिंदे यांच्या तसेच भाजप कार्यालयाजवळ जमलेल्या चाहत्यांनी महायुतीने प्रचंड बहुमत मिळताच विजयाच्या घोषणा दिल्या. उद्या नव्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली असून 26 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. सायंकाळपर्यंत अंतिम …
Read More »म. मं ताराराणी पदवीपूर्व कॉलेजची समृद्धी पाटील इंग्लिश निबंध स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम!
खानापूर : मराठा मंडळ संचलित ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर या नामांकित पदवीपूर्व महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी नुकत्याच संपन्न झालेल्या तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले होते आता बैलहोंगलमध्ये जिल्हास्तरीय स्पर्धेतही विशेष यश संपादन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 2024-25 शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या बेळगाव जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धा बैलहोंगल या ठिकाणी …
Read More »“चौगुले पाटील ॲग्रो इंडस्ट्रीज”च्या गुऱ्हाळाचे थाटात उद्घाटन
खानापूर : नामांकित कंपनीत गलेलठ्ठ पगाराची नोकरी असताना देखील शेतीकडे वळून त्यातून उद्योग निर्मिती करण्याचे धाडस खानापूर शहरातील नवउद्योजिका सौ. स्मितल प्रदीप पाटील, विशाल चौगुले यांचे धाडस कौतुकास्पद आहे. तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचे व्यवसाय सुरू करावे जेणेकरून खानापूरसारख्या छोट्या शहरांमध्ये देखील गरजूंना रोजगाराची संधी उपलब्ध होईल, त्यासाठी …
Read More »संकेश्वर : प्रभाग 21 पोटनिवडणुकीसाठी आज मतदान
संकेश्वर : प्रभाग 21 पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. दिवंगत आप्पाजी मर्डी यांच्या निधन झालेल्या रिक्त जागेसाठी भारती मर्डी काँग्रेस व गंगाराम भुसगोळ अपक्ष असे रिंगणात उभे राहिले आहेत. गत चार दिवसांपासून दोन्ही उमेदवारांनी घरोघरी जाऊन प्रचार केला आहे. शनिवार 23 रोजी मतदान, मंगळवार दि.26 रोजी निकाल जाहीर …
Read More »गौतम अदानींना तात्काळ अटक करा : खर्गेंचे मोदी सरकारला आवाहन
बंगळूर : एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्र सरकारला लाचखोरी प्रकरणात अमेरिकेतून अटक वॉरंट मिळालेल्या उद्योगपती अदानीविरुद्ध तातडीने कारवाई करण्याची विनंती केली आहे. अदानी यांना पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारकडून संरक्षण मिळत असल्याचा आरोप करत खर्गे म्हणाले की, आम्ही हा मुद्दा संसदेत मांडू. याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. …
Read More »‘वक्फ’ला विवाह प्रमाणपत्र देण्याच्या आदेशाला स्थगिती : उच्च न्यायालयाचा आदेश
बंगळूर : कर्नाटक राज्य वक्फ मंडळाला मुस्लिम अर्जदारांना विवाह प्रमाणपत्र जारी करण्याची परवानगी देणाऱ्या सरकारी आदेशास, अंतरिम आदेशात, कर्नाटक उच्च न्यायालयाने गुरुवारी सात जानेवारी २०२५ पर्यंत स्थगिती दिली. एका जनहित याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारिया आणि न्यायमूर्ती के. व्ही. अरविंद यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. “सशक्त प्रथमदर्शनी प्रकरण …
Read More »श्री ज्योतिबा मंदिर शिवबसव नगर बेळगाव यांच्या वतीने रविवारी दीपोत्सव
बेळगाव : श्री ज्योतिबा मंदिर शिवबसव नगर बेळगाव यांच्या वतीने रविवार दिनांक 24 नोव्हेंबर 2024 रोजी दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. 11 हजार दिप लावण्याची संकल्पना करण्यात आली असून सकाळी 7 वाजता अभिषेक व विशेष पूजेने दीपोत्सवास सुरुवात होणार आहे. सायंकाळी 5.30 वाजता दीप लावण्यास प्रारंभ होईल. त्यानंतर …
Read More »रुद्रण्णा यडवण्णावर आत्महत्येप्रकरणी तपासाला गती
बेळगाव : बेळगाव तहसीलदार कार्यालयात आत्महत्या केलेल्या एसडीए कर्मचारी रुद्रण्णा यडवण्णावर यांच्या प्रकरणात अनेक खुलासे पुढे आले असून निनावी पत्र आणि व्हॉट्सअॅप मेसेजमुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. बेळगाव तहसीलदार कार्यालयातील एसडीए कर्मचारी रुद्रण्णा यडवण्णावर यांच्या आत्महत्येप्रकरणी तहसीलदार बसवराज नागराळ आणि चालक अशोक कब्बलिगेर यांची सखोल चौकशी सुरू आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta