Tuesday , June 2 2026
Breaking News

Belgaum Varta

स्नेहम कारखान्याला आग; एकाचा मृतदेह सापडला

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील नावगे गावच्या हद्दीतील स्नेहम इंटरनॅशनल इन्सुलिन टेप निर्मिती कारखान्याला काल रात्री 8.45 च्या दरम्यान आग लागली. यामध्ये एकाचा मृतदेह सापडला असून तीन कामगार गंभीर भाजले असून त्यांना बुधवारी सकाळी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मारुती करवेकर (32), यल्लाप्पा सालगुडे (35), रणजित पाटील (39) हे …

Read More »

खानापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी केली पाहणी

  खानापूर : माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर तसेच खानापूर तहसीलदार यांनी आज खानापूर तालुक्यात पावसामुळे पडलेल्या घरांचा पहाणी दौरा केला. खानापूर तालुक्यात पावसामुळे एकूण 201 घरांची पडझड झाली आहे. त्यापैकी 39 घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली असल्याचे डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी सांगितले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, काँग्रेस सरकार हे …

Read More »

तालुका समिती अध्यक्ष कै. निंगोजीराव हुद्दार यांची उद्या शोकसभा

  बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष कै. निंगोजीराव हुद्दार यांची शोकसभा गुरुवार दिनांक ८ रोजी दुपारी २.०० वाजता मराठा मंदिर (रेल्वे ओव्हर ब्रिज) येथे होणार आहे. तरी या शोकसभेला महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, सदस्यांनी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, आजी-माजी लोकप्रतिनिधींनी, सीमा …

Read More »

कारवार-गोवा संपर्क पूल कोसळला; लॉरी नदीत

  कारवार : कारवार-गोव्याला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील कोडीबाग पूल कोसळला आहे. काळी नदीवर ४३ वर्षांपूर्वी बांधलेला हा पूल मध्यरात्रीच्या सुमारास कोसळला आणि एक लॉरी नदीत पडली. पोलिसांनी ट्रकचालकाची सुटका केली. मात्र याआधी कोणती वाहने पुलावरून नदीत कोसळली आहेत काय हे समजू शकलेले नाही. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी व पोलीस अधिकारी …

Read More »

नावगे क्रॉस येथील स्नेहम कंपनीला भीषण आग; अनेकजण अडकल्याची शक्यता

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील नावगे गावाजवळ असलेल्या स्नेहम चिकटपट्टी निर्मिती कारखान्याला मंगळवारी रात्री 8.45 च्या दरम्यान अचानक आग लागली असून कारखान्यात अनेकजण अडकल्याची शक्यता आहे. आगीत संपूर्ण कारखाना जळून खाक झाला आहे. कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक असल्याने आग पसरली. आग लागली त्यावेळी 100 हून अधिक जण आत असल्याची माहिती …

Read More »

बेळगावमध्ये भाजप-जेडीएसविरोधात शोषित समाजाच्या वतीने भव्य निदर्शने

  बेळगाव : मुडा घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या चारित्र्याचे हणन करण्याचे षडयंत्र विरोधकांनी रचले असून राज्यपालांनी कोणाच्याही दबावाला बळी पडू नये, या मागणीसाठी बेळगावात भाजप आणि जेडीएसच्या विरोधात शोषित समाजाच्या वतीने भव्य निदर्शने करण्यात आली. अहिंद नेते, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पाठीशी उभ्या असलेल्या शोषित समाजाच्या वतीने आज बेळगावात जोरदार आंदोलन …

Read More »

….चक्क टायर ट्यूबचा वापर करून विद्यार्थी ओलांडतात नदी!

  बेळगाव : मुसळधार पावसामुळे बेळगाव जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून अनेक ठिकाणी शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र अनेक ठिकाणी शाळा सुरू आहेत. पावसाळ्यात भरून वाहणाऱ्या नदीतून चक्क टायर ट्यूबवरून मुले शाळेत जात असल्याचे पहावयास मिळत आहे. कित्तूर तालुक्यातील निंगापुर गावातील तलाव पावसाच्या पाण्यामुळे भरला असून संपूर्ण …

Read More »

अथणी येथे ऑटोमोबाईल दुकानाला आग; लाखोंचे नुकसान

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील अथणी शहरातील जत रोडवर असलेल्या एका ऑटोमोबाईल दुकानाला काल रात्री उशिरा भीषण आग लागून मोठ्या प्रमाणात माल जळून खाक झाला. अथणी शहरातील रहिवासी बसवराज यांच्या ऑटोमोबाईल दुकानातील लाखो रुपयांची वाहने, वाहनांचे सुटे भाग व सर्व साहित्य जळून खाक झाले. आगीची माहिती मिळताच अथणी अग्निशमन दलाने …

Read More »

निपाणीत ‘शिवशंभोचा’ गजर

  पहिला श्रावण सोमवार; दर्शनासाठी भाविकांच्या रांगा निपाणी (वार्ता) : यंदा बऱ्याच वर्षानंतर श्रावणाच्या पहिल्याच दिवशी सोमवार आला त्यामुळे निपाणी शहरासह परिसरातील शिव मंदिरे सोमवारी (ता.५) भाविकांनी फुलून गेली होती. शिवाय दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमासह ‘हर हर महादेवाचा गजर सुरू होता. अनेक ठिकाणी दर्शनासाठी रांगा केल्याने भाविकांची चांगली सोय झाली. …

Read More »

यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चित करा अपयशाला घाबरू नका : राहुल पाटील

  बेळगाव : तुमच्या आयुष्यात रोल मॉडेल असणे फार महत्त्वाचे आहे. त्यांचे मार्गदर्शन घ्या. आयुष्यात कोणत्याही पदावर गेला तरी आपल्या मातीला विसरू नका, उच्च ध्येय गाठत असताना येणाऱ्या अडचणी व अपयश यांना खचून न जाता सतत प्रयत्नशील राहून यश मिळवता येते, असे उद्गार कलखांब गावचे सुपुत्र व 2023 च्या नागरी …

Read More »