Sunday , July 26 2026
Breaking News

युवा समितीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ जयंती साजरी

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ जयंती युवा समिती कार्यालय टिळकवाडी बेळगाव येथे साजरी करण्यात आली.
अध्यक्ष अंकुश केसरकर आणि खजिनदार विनायक कावळे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलताना अध्यक्ष अंकुश केसरकर म्हणाले की, बाबासाहेबांनी लोकशाही बळकट करण्यासाठी आणि आपले हक्क मिळविण्यासाठी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असे सांगितले होते. तेव्हा आपण संघटित होऊन सीमाप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. तसेच आजच्या काळात बाबासाहेबांच्या विचारांवर चालायची गरज असून सिमालढा आजपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाहीची तत्वे आखून दिली आहेत त्यानुसारच लढला जात आहे आणि याच लोकशाही मार्गाने न्याय नक्की मिळेल अशी आशा व्यक्त केली.
यावेळी सरचिटणीस श्रीकांत कदम, उपाध्यक्ष वासू सामजी, विनायक कावळे, किरण हुद्दार, सुरज कुडूचकर, राकेश सावंत, महांतेश अलगोंडि, आकाश भेकणे, प्रतीक पाटील, महेश चौगुले, अश्वजीत चौधरी, विशाल गौंडाडकर आदी उपस्थित होते

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *