Sunday , July 26 2026
Breaking News

श्री शिवजयंतीनिमित्त उद्या ‘येथे’ शिवकालीन युद्ध कलेचा भव्य कार्यक्रम

Spread the love

बेळगाव : श्री शिवजयंती उत्सवानिमित्त गाडेमार्ग, बिच्चू गल्ली शहापूर बेळगाव येथील धर्मवीर श्री संभाजी युवक मंडळ आणि श्री शिवनेरी युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या रविवार दि. 19 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता इतिहासातील रणमर्द मराठ्यांचा पराक्रम जागवणारा शिवकालीन युद्ध कलेचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

गाडेमार्ग, बिच्चू गल्ली शहापूर बेळगाव येथे हा कार्यक्रम होणार असून ज्यामध्ये पारंपरिक शस्त्रकला मर्दानी खेळ आणि शिवकालीन पराक्रमाचे जिवंत दर्शन घडविण्यात येणार आहे. यासोबत शाहीर मिलिंद सावंत यांचा ऐतिहासिक पोवाडे व शिवसंस्कारीत समाज प्रबोधनाचा कार्यक्रमही होणार आहे. सदर कार्यक्रमानंतर रात्री 8:30 वाजता शिवजयंती निमित्त महाप्रसादाचे वितरणही केले जाणार आहे. तरी शिवभक्तांसह शहरवासीयांनी उपरोक्त कार्यक्रमांना बहुसंख्येने उपस्थित राहून ते यशस्वी करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *