Monday , September 21 2026
Breaking News

बोरगाव आर. ए. पाटील पब्लिक स्कूलचा दहावीचा शंभर टक्के निकाल

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील श्री. एआरडी सोसायटीच्या आर. ए. पाटील पब्लिक स्कूलच्या शाळेने शैक्षणिक वर्ष २०२५ -२६ मधील १०वी सीबीएसई परीक्षेत शंभर टक्के निकालाची कामगिरी नोंदवली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणांसह यश संपादन करून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.
या परीक्षेत सक्षम पाटील (९४.९३ टक्के), स्तवन पाटील (९३.६), अक्षय अम्मण्णावर (९१.२ टक्के) गुण मिळवून प्रथम ते तृतीय क्रमांक पटकाविला.
विशेष प्राविण्य श्रेणीत १६ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत १४ विद्यार्थी आणि द्वितीय श्रेणीत ४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
संस्थेचे अध्यक्ष सहकाररत्न उत्तम पाटील, संचालिका मीनाक्षी पाटील, उद्योजक अभिनंदन उर्फ बच्चू पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. मीनाक्षी पाटील यांनी,
विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रम, चिकाटी, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्याने हे यश शक्य झाले आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील जिद्द याचे हे यशस्वी फलीत असल्याचे सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *