Sunday , July 26 2026
Breaking News

बिच्चु गल्ली शिवकालीन कार्यक्रमाला पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांची उपस्थिती

Spread the love

 

बेळगाव : बेळगावात होणाऱ्या पारंपरिक शिवजयंती उत्सवा निमित्त गाडेमार्ग बिच्चु गल्ली शहापूर येथील धर्मवीर श्री संभाजी युवक मंडळ व श्री शिवनेरी युवक मंडळ आयोजित शिवसंस्कृतीचा वारसा जपत आणि इतिहासातील पराक्रम जागवत, शिवकालीन युद्धकलेचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.या कार्यक्रमात पारंपरिक शस्त्रकला, मर्दानी खेळ आणि शिवकालीन पराक्रमाचे जिवंत दर्शन घडविण्यात येणार आहे.

हा कार्यक्रम बिच्चु गल्ली कॉर्नर गाडेमार्ग येथे रविवार दिनांक १९ एप्रिल रोजी सायंकाळी ६.०० वाजता होणार असून उदघाटक म्हणून बेळगावचे पोलीस आयुक्त श्री. भूषण गुलाबराव बोरसे हे उपस्थित राहणार आहेत.

आज शनिवार दिनांक १८ एप्रिल रोजी आयुक्तांना मंडळाच्या वतीने कार्यक्रमाला निमंत्रित करण्यात आले, यावेळी संपर्क प्रमुख विकास कलघटगी, सुरज जाधव, निलेश काकतकर, सचिन धाडवे, विशाल सावंत, विनायक पाटील, ओमकार बैलूरकर आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन रात्री ठीक ८:३० वाजता करण्यात आले आहे.
आपण आपल्या परिवारासह उपस्थित राहून या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन मंडळांच्या वतीने करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *