
बेळगाव : हिंदवाडी येथील पुरातन श्री घुमटमाळ मारुती मंदिरच्या ट्रस्ट कमिटीची बैठक मावळते अध्यक्ष श्री. चंद्रकांत बांडगी यांच्या अध्यक्षतेखाली होऊन आगामी वर्षासाठी श्री. कुलदीप भेकणे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. याचबरोबर उपाध्यक्षपदी प्रकाश फल्लोद -माहेश्वरी आणि सचिव पदी अनंत लाड यांची एकमताने निवड करण्यात आली.
कुलदीप भेकणे हे उद्योजक असून सामाजिक कार्यात हिरीरीने भाग येतात. मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या उभारणी आणि वाटचालीत भेकणे परिवाराचा महत्त्वाचा वाटा आहे.
प्रकाश माहेश्वरी हे पॉलिस्टर यार्न ट्रेडिंग व्यावसायिक असून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. आरएसएसचे कार्यकर्ते म्हणून ते परिचित आहेत तर अनंत लाड हे मंदिराचे माजी अध्यक्ष असून सार्वजनिक वाचनालय, पायोनियर अर्बन बँक, बेळगाव जायंट्स, आधार सोसायटी आणि आनंद ऍडव्हर्टायझिंग अशा अनेक संस्थांची निगडित आहेत.
मावळत्या कार्यकारणीला निरोप आणि नव्या कार्यकारणीचे स्वागत करणारी रघुनाथ बांडगी, सुनील चौगुले आदींची भाषणे झाली. यावेळी संभाजी चव्हाण, गोपाळराव बिरजे, हिरालाल पटेल, सुनील सरनोबत व बाळू किल्लेकर आदी सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta