Sunday , July 26 2026
Breaking News

गुगल लेआउटच्या सीमांवरून वाद; महानगरपालिकेला सोडवता येईना प्रश्न

Spread the love

 

हाऊस लिस्टिंगमध्ये शिक्षक अडकले; स्पष्ट मार्गदर्शनाचा अभाव

बेळगाव : जनगणना हाऊस लिस्टिंगच्या कामात अनेक ठिकाणी सीमा निश्चितीवरून वाद निर्माण होत असल्याचे चित्र समोर आले आहे. गुगल मॅप लेआउटच्या आधारे काही भागांची सीमा निश्चित करण्यात आली होती; मात्र प्रत्यक्ष क्षेत्रात या सीमांबाबत गोंधळ निर्माण होत आहे.

काही ठिकाणी दोन वेगवेगळ्या प्रभागांच्या सीमांवरून शिक्षकांमध्ये वादावादीचे प्रसंग घडत असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणांमध्ये स्पष्ट निर्णय देण्यात महानगरपालिकेला अद्याप यश आलेले नाही.चार्ज अधिकारी स्वतः प्रगणकांचा सामना करण्याऐवजी बिल कलेक्टरला पाठवून सीमावाद मिटवण्याचा प्रयत्न करीत आहेत

यामुळे शिक्षकांना घरांची नोंदणी करताना मोठा अडथळा निर्माण होत आहे. अनेक ठिकाणी कोणत्या प्रभागात घराची नोंद करायची याबाबत संभ्रम असल्याने काम थांबण्याची वेळ येत आहे.

याशिवाय वार्ड अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोन उचलला जात नसल्याची तक्रारही शिक्षकांनी केली आहे. मात्र दुसरीकडे प्रशासनाकडून वेळेत काम पूर्ण करण्याचा दबाव वाढवला जात आहे.
या सर्व गोंधळामुळे जनगणनेच्या हाऊस लिस्टिंग प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. प्रशासनाने तातडीने सीमावाद सोडवून स्पष्ट मार्गदर्शक सूचना देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *