Sunday , July 26 2026
Breaking News

साधनांशिवाय जनगणना हाऊस लिस्टिंग; शिक्षकांची उन्हातान्हात परवड

Spread the love

 

किट नाही, पाणी नाही, बॅग नाही; तरीही कामाचा तगादा

बेळगाव  : कर्नाटकात १५ तारखेला स्वगणना प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १६, १७ आणि १८ तारखेला जनगणना २०२७ साठी हाऊस लिस्टिंगचे काम सुरू करण्यात आले. या पार्श्वभूमीवर तातडीच्या बैठका घेऊन प्रगणकाना कामावर पाठवण्यात आले. यापूर्वी त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर आवश्यक असलेल्या साहित्याची पूर्तता अद्याप करण्यात आलेली नसल्याने शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

हाऊस लिस्टिंगसाठी काम करणाऱ्या शिक्षकांना टोपी, बॉल पेन, पेपर, पेन्सिल, खोडरबर मार्कर पेन, कागद, बॅग, प्लास्टिक पिशवी, पाण्याची बाटली यांसारख्या मूलभूत वस्तू अद्याप देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे उन्हातान्हात घराघरांत फिरताना शिक्षकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, काही ठिकाणी शिक्षकांनी स्वतःच्या खर्चाने साहित्य आणून काम सुरू ठेवले आहे.

दरम्यान, प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या वस्तू आणण्यासाठी कार्यालयात या असे आदेश वार्ड अधिकाऱ्यांकडून दिले जात असल्याने शिक्षक, पर्यवेक्षक आणि प्रगणक यांच्यात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. कामाची जबाबदारी शिक्षकांवर टाकली असताना आवश्यक साधनांची पूर्तता मात्र प्रशासनाकडून होत नसल्याची टीका होत आहे.
याबाबत प्रशिक्षणाच्या वेळेला मोठ्या मोठ्या गोष्टी बोलणारे महानगरपालीकेचे महसूल उपायुक्त डॉ. सिद्धू कुल्लोळी मात्र या वेळेला गायब झाले असून प्रगणकांचा सामना करण्याचे ते टाळत आहेत सगळी जबाबदारी चार्ज अधिकाऱ्यांच्या वर ढकलून मोकळे झाले आहेत
उन्हाच्या तीव्रतेत दिवसभर काम करूनही आवश्यक सुविधा मिळत नसल्याने शिक्षकांमध्ये नाराजी वाढत आहे. प्रशासनाने तातडीने संपूर्ण किट उपलब्ध करून द्यावे आणि कामाचे स्पष्ट नियोजन जाहीर करावे, अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *