Monday , September 21 2026
Breaking News

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने पारंपारिक शिवजयंती उत्साहात साजरी

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने पारंपारिक शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराज चौकात शिवज्योतींचे स्वागत करण्यात आले,
नरगुंदकर भावे चौक, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान शहापूर, शिवसेना रिक्षा स्थानक, एस पी एम रोड, कोरे गल्ली शहापूर आदी विविध ठिकाणी महाराजांना अभिवादन करण्यात आले.

शतकाहून अधिक वर्षाची वैभवशाली परंपरा असलेली बेळगावची शिवजयंती अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर साजरी होते. या दिवशी अवघी शिवसृष्टी बेळगावच्या गल्लीबोळात, चौका-चौकात अवतरलेली दिसते, शिवरायांचा इतिहास घराघरात पोहचवा आणि बेळगांव सह सीमावासियांच्या मनात शिवाजी महाराजांप्रति जो आदर, आस्था आहे ते दाखवण्याचे माध्यम ही शिवजयंती आहे, शिवरायांच्या शौर्याच, त्यागाच आणि स्वाभिमानाचं प्रतीक म्हणून ही शिवजयंती आम्ही मोठ्या उत्साहात साजरी करतो. प्रतिवर्षीप्रमाणे ही शिवजयंती आणि चित्ररथ मिरवणूक शांततेत कोणत्याही प्रकारचं गालबोट न लागता बेळगावकरानी साजरी करावी, असे आवाहन युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी केले.

यावेळी कार्याध्यक्ष धनंजय पाटील, खजिनदार शिवाजी मंडोळकर, अशोक घगवे, सुरज जाधव, रमेश माळवी, मोतेश बारदेसकर यांच्यासह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *