Sunday , September 20 2026
Breaking News

शिवजयंतीनिमित्त निपाणीत मिरवणुकीसह सजीव देखावा स्पर्धेचे आयोजन

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे शिवजयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. या कार्यक्रमांस शिवप्रेमी, युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.
शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील चौका चौकात पताके लावण्यात आले असून भगव्या ध्वजांनी शहर भागविणे बनले आहे. शिवजयंती निमित्त रविवारी (ता.१९ ) सकाळी ८ वाजता शिवजन्मोत्सव, अभिषेक व पूजा, जिजाऊ महिला मंडळातर्फे पाळणा पूजन, शिवज्योतींचे स्वागत करण्यात येणार आहे. सोमवारी (ता.२०) दुपारी ३ वाजता होणाऱ्या भव्य मिरवणुकीतील सजीव देखावा स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे २५००१ रुपये, १५००१, ११००१ रुपये बक्षीस देण्यात येणार आहेत. २४ रोजी सायंकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे स्वरस्वामी प्रस्तुत सलाम महाराष्ट्र सुवर्ण संस्कृतीचा लोकोत्सव कार्यक्रम होणार आहे. २६ रोजी सांयकाळी ७ वाजता प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांचे संभाजी महाराजांच्या जीवनावर व्याख्यान होणार आहे. कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब जासूद, उपाध्यक्ष संजय माने व संचालक मंडळाने केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *