Sunday , June 7 2026
Breaking News

उद्या दुपारी जाहीर होणार एसएसएलसीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकतेची कमाल!

Spread the love

 

बेळगाव : आताच आमच्या लोकप्रिय सोशल मेडियाला मिळालेल्या माहितीनुसार गुरुवार दि. २२ एप्रिल २०२६
कर्नाटक शालेय परीक्षा व मूल्यमापन मंडळाने इयत्ता दहावी (SSLC) परीक्षेचा निकाल जाहीर करण्याबाबत अधिकृत सूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार, दि. २३ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता निकाल घोषित करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना आपला निकाल अधिकृत संकेतस्थळ [https://karresults.nic.in](https://karresults.nic.in) तसेच KarnatakaOne Mobile App द्वारे पाहता येणार आहे. याशिवाय, मोबाईल संदेश (SMS) सुविधेद्वारेही निकाल मिळवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तसेच, विद्यार्थ्यांचे गुणपत्रक (Marks Card) DigiLocker या डिजिटल माध्यमातूनही उपलब्ध होणार असून, त्यासाठी [https://www.digilocker.gov.in](https://www.digilocker.gov.in) या संकेतस्थळाचा उपयोग करता येईल. विद्यार्थ्यांनी DigiLocker वर आपले खाते तयार करून गुणपत्रक डाउनलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
निकाल कसा पाहायचा याबाबत सविस्तर माहिती देणारी व्हिडिओ लिंकही मंडळाने उपलब्ध करून दिली आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रक्रिया समजून घेणे सोपे होणार आहे.
दरम्यान, राज्यभरातील लाखो विद्यार्थी व पालकांमध्ये निकालाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून, उद्याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

About Belgaum Varta

Check Also

आदित्यराज कॅपिटलच्या कर्मचाऱ्यांकडून पत्रकारांवर हल्ल्याचा प्रयत्न

Spread the love  बेळगाव : बहुकोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीच्या आरोपांमुळे चर्चेत असलेल्या आदित्यराज कॅपिटल प्रायव्हेट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *