Sunday , September 20 2026
Breaking News

लग्न समारंभ, वास्तुशांतीमुळे फुलांच्या दरात तेजी

Spread the love

 

मोगरा १००० रुपये किलो : गजऱ्याचे दरही दुप्पट

निपाणी (वार्ता) : अक्षय तृतीयेपासून विवाह सोहळ्यांना प्रारंभ झाला आहे. पुढील काही दिवस आणखीन मुहूर्त असल्यामुळे सर्वच प्रकारच्या फुलांच्या दरांत वाढ झाली आहे. लग्न समारंभात महिलांची विशेष पसंती असलेल्या गजऱ्यासाठी लागणाऱ्या एक किलो मोगऱ्याचा दर १००० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. याशिवाय झेंडू, गुलाब शेवंती आदी फुलांच्या दरातही वाढ झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून फुलांना मागणी नसल्याने दरात घट झाली होती. झेंडूचे दर १५ रुपये किलो होत होते. परंतु अक्षय तृतीया पासून विवाह कार्यक्रमांना प्रारंभ होताच दरामध्ये वाढ झाली असून झेंडू ३० रुपये किलो पर्यंत पोहोचला आहे. मंगळवारी (ता.२१) निपाणी फुल लांब व आखूड दांडीचा गुलाब ४००० रुपये शेकडा असा होता. शेवंती १५० ते १६५ रुपये किलो, अस्टर १२० रुपये निशिगंध ८० रुपये, बटन गुलाब २०० रुपये किलो, लिली बंडल २० रुपये प्रमाणे विक्री सुरू आहे.
रविवारी (ता. १९) अक्षयतृतीये दिवशी फुलांची चांगली आवक झाली होती. त्यातुलनेत सोमवारी आवक कमी झाली. पुढील काळात जास्त विवाह मुहूर्त असल्याने केवळ झेंडूच नव्हे तर सर्व प्रकारच्या फुलांचे दर तेजीतच राहण्याची शक्यता असल्याची शक्यता फुल व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *