Sunday , July 26 2026
Breaking News

गॅस दरवाढीने चुलीवरच्या जेवणाला ‘अच्छे दिन’

Spread the love

 

सर्वत्र सिलिंडरचा तुटवडा; ‘त्या’ हॉटेलकडे वळले खवय्ये

निपाणी (वार्ता) : इराण-इस्त्राईल युध्दजन्य परिस्थिती सुरू आहे आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर आर-पारची लढाई सुरू केली आहे. या युध्दाची झळ सगळ्यांनाच बसू लागली आहे. ही झळ स्वयंपाक घरापर्यंत आली आहे. शहरासह ग्रामीण भागात सिलिंडरची टंचाई झाली आहे. खेड्या पाड्यात सिलिंडर संपल्याने गृहिणींनी चुली फुंकायला सुरुवात केली आहे. तर चुलीवरच्या भोजनासाठी प्रसिध्द असलेल्या हॉटेल्सकडे खवय्यांनी मोर्चा वळविला आहे. त्यामुळे ‘अच्छे दिन’ आले आहेत.
प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या माध्यमातून खेडोपाडी प्रत्येक घरात गॅस सिलिंडर आणि शेगड्या पोहचल्या आहेत. बहुतेक घरांमध्ये चुलीचा वापर कमी झाला आहे. मात्र ज्यांचा सिलिंडर संपला आहे.
त्या महिलांची तारेवरची कसरत सुरू झाली आहे. त्या घरांमध्ये पुन्हा चुलीवर स्वयंपाक सुरू झाला आहे. तर सिमेंट काँक्रीटच्या घरात राहणाऱ्या गृहिणींनी अंगणात चुलीमांडून स्वयंपाक सुरू केला आहे. शहरातील गृहिणिंनी अडगळीत ठेवलेल्या विद्युत शेगड्या बाहेर काढल्या आहेत. सिलिंडर संपल्याने बरीच मंडळी आता जिवाचे रान करू लागली आहेत. ‘कोणी सिलेंडर देता का सिलेंडर’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *