Tuesday , September 1 2026
Breaking News

मनपा आयुक्तांकडून कपिलेश्वर तलावाची पाहणी

Spread the love

 

बेळगाव : दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर परिसरातील तलावाची भिंत कोसळून दोन बालकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या महानगरपालिका प्रशासनाने आज घटनास्थळाची पाहणी करून सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत चर्चा केली. बेळगावमधील दक्षिण काशी श्री कपिलेश्वर मंदिराच्या मागील बाजूला असलेल्या तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन बालकांचा भिंत कोसळून मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त होत होती. या भीषण दुर्घटनेनंतर बेळगाव महानगरपालिका आयुक्त कार्तिक एम., नगरसेवक राजू भातकांडे आणि अभियंत्यांच्या पथकाने आज प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी तलावाच्या सद्यस्थितीची पाहणी केली आणि तातडीने घ्यावयाच्या खबरदारीच्या उपायांबाबत मालकांशी चर्चा केली.

पाहणीनंतर बोलताना आयुक्त कार्तिक एम. यांनी स्पष्ट केले की, या तलावाची जागा खासगी मालकीची आहे. अलीकडे झालेल्या पावसामुळे तलावाच्या दुसऱ्या बाजूची भिंतही कोसळली असून ती अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून तलावाच्या आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महसूल विभाग आणि अभियंत्यांनी संयुक्तपणे या जागेचे सर्वेक्षण केले असून पुढील धोका टाळण्यासाठी आवश्यक पावले उचलली जात असल्याची माहिती कार्तिक एम. यांनी दिली. नगरसेवक राजू भातकांडे यांनी या संदर्भातील समस्या मांडली.

About Belgaum Varta

Check Also

वडगाव जनावरांचा दवाखाना स्टाफअभावी बंद; शेतकऱ्यांची गैरसोय

Spread the love  वडगाव : जुने बेळगाव व वडगाव परिसरातील हजारो जनावरांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *