
बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव जिल्हा कॉन्ट्रॅक्ट ब्रिज संघटना आणि कर्नाटक राज्य ब्रिज संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय राष्ट्रीयस्तरावरील ब्रिज स्पर्धेत अ गटात आनंद सामंत व शशिकांत शिंदे तर ब गटात कश्यप आणि क्लिफर्ड या जोडीने प्रथम क्रमांकासह अजिंक्यपद पटकाविले.
तिसऱ्या रेल्वे गेट जवळ असलेल्या नेटिव्ह हॉटेलच्या सभागृहात संपन्न झालेल्या सदर स्पर्धेत ५० हुन अधिक जोडीने भाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या स्पर्धेत अ गटात आनंद सामंत व शशिकांत शिंदे प्रथम क्रमांक, व्यंकटेश व कार्तिकेयन द्वितीय क्रमांक, राजेंद्र बर्वे व एम. आय. हेगडे तृतीय क्रमांक तसेच ब गटात कश्यप व क्लिफर्ड प्रथम क्रमांक, हरे राम उर्फ एच.डी. काद्रोलकर आणि विनायक सी. आर. द्वितीय क्रमांक सुशील शर्मा व सुदाराम तृतीय क्रमांक पटकाविला. अंतिम स्पर्धेनंतर झालेल्या बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून सिद्धार्थ चंदगडकर, नितीन लोकूर, अभिजीत भागवत यांच्या हस्ते विजेत्या, उपविजेत्या आणि तिसऱ्या क्रमांक पटकावलेल्या ब्रिजपटूना अनुक्रमे रोख बक्षीस व सुहासचंद्र चंदगडकर व दिलीप भागवत स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. यावेळी व्यासपीठावर समारंभाला बेळगाव जिल्हा कॉन्ट्रॅक्ट ब्रिज असोसिएशनचे अध्यक्ष एस. वाय. प्रभू, आनंद गाडगीळ, सुब्रमण्यम, नंदकुमार देशपांडे, संतोष ममदापूरे व्यासपीठावर उपस्थित होते. या अखिल भारतीय राष्ट्रीय स्तरावरील ब्रिज स्पर्धेत मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, गोवा बंगळूर येथील नामवंत ब्रिजपटुनी भाग घेतला होता.
Belgaum Varta Belgaum Varta