Monday , September 21 2026
Breaking News

किरकोळ वादातून नातवाकडून आजीची हत्या; अगसगे येथील घटना

Spread the love

 

बेळगाव : अगसगे गावात घरगुती वादाचे रूपांतर थेट हत्येत झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. नातवाने संतापाच्या भरात आजीवर चाकूने हल्ला केल्याने तिचा मृत्यू झाला.

मृत महिलेची ओळख बाळव्वा कलगौडा पाटील (७०) अशी झाली आहे. तर कलगौडा अप्पय्यागौडा पाटील (२४) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेची नोंद काकती पोलीस स्थानकात करण्यात आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री घरातील किरकोळ कारणावरून आजी-नातवामध्ये बाचाबाची झाली होती. काही वेळातच वाद तीव्र झाला आणि संतापलेल्या नातवाने घरातील धारदार चाकू उचलून आजीवर सपासप वार केले.

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बाळव्वा पाटील यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *