Monday , September 21 2026
Breaking News

शिवम असोसिएट्सवरील सीआयडी कारवाईमुळे करवे जिल्हाध्यक्ष अडचणीत

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘बेळगाव महोत्सवा’त जमा झालेल्या निधीच्या गैरवापराबाबत नवे आरोप समोर आले आहेत. शिवम असोसिएट्सचे मालक शिवानंद निलण्णावर यांच्या प्रायोजकत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमातून सुमारे १.५ कोटी रुपये जमा झाल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकरणात कर्नाटक रक्षण वेदिकेच्या प्रवीण शेट्टी गटाचे जिल्हाध्यक्ष आर. अभिलाष यांना आलिशान कार भेट देण्यात आल्याचा आरोप असून, ही कार ठेवीदारांच्या पैशातून खरेदी करण्यात आली का, याचा तपास सीआयडीकडून सुरू करण्यात आला आहे.

सीआयडी अधिकाऱ्यांनी संबंधित कार तपासासाठी ताब्यात देण्याच्या सूचना अभिलाष यांना दिल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, अभिलाष यांनी सोशल मीडियावर कार स्वीकारतानाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. मात्र, वाद वाढल्यानंतर त्यांनी त्या पोस्ट हटवल्या.

यापूर्वीही शिवानंद निलण्णावर यांनी विविध कार्यक्रमांच्या आयोजकांना कार भेट देण्याचे आश्वासन दिल्याची चर्चा होती. त्यामुळे या सर्व व्यवहारांची चौकशी करण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *