Monday , September 21 2026
Breaking News

बेळगाव आर्थिक गैरव्यवहार प्रकरण: शिवानंद निलण्णावर याला १० दिवसांची सीआयडी कोठडी

Spread the love

 

बेळगाव : बेळगावमधील बहुकोटी गैरव्यवहारातील संशयित आरोपी शिवानंद निलण्णावर याला न्यायालयाने १० दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे. सुनावणी दरम्यान न्यायालय कक्षात न्यायाधीश आणि आरोपी यांच्यात महत्त्वाची चर्चा झाली असून, पुढील चौकशीसाठी आरोपीला बंगळुरूला हलवण्यात येत आहे.

बेळगावचे २ रे अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश गंगाधर के. एन. यांनी हा निर्णय दिला. सुमारे ३५ हजार गुंतवणूकदारांची १ हजार कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे हे प्रकरण असून, राज्य तसेच परराज्यात जाऊन तपास करावा लागणार असल्याने सीआयडी अधिकाऱ्यांनी कोठडीची मागणी केली होती. सुनावणी दरम्यान आरोपीने आपल्याला मधुमेह आणि हृदयाचा त्रास असल्याचे सांगितल्यावर न्यायाधीशांनी त्याला वैद्यकीय सुविधा पुरवण्याचे निर्देश दिले. “३५ हजार लोकांना पैशांची गरज नाही, माझी गरज आहे,” असे आरोपीने म्हणताच न्यायाधीशांनी त्याला सुनावले की, “अमपाळ लोकांचे रक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. अनेक जण पैसे घेऊन पळून गेले आहेत. इतिहासातून धडा घेण्यासाठी हा कायदा आणला आहे, धर्मो रक्षती रक्षितः.” न्यायालय कक्षाबाहेर येताच आपल्या भावाला पाहून शिवानंद निलण्णावर याला रडू कोसळले.

सीआयडी डीजीपी भीमाशंकर गुळेद यांच्या नेतृत्वाखालील पथकाने प्राथमिक तपास पूर्ण केला असून, माळमारुती पोलिसांनी गोळा केलेल्या कागदपत्रांसह आरोपीला आजच बंगळुरूला नेऊन त्याची चौकशी केली जाणार आहे. गुंतवणूकदारांचे पैसे देण्यास आरोपी तयार असल्याचा त्याच्या वकिलांचा युक्तिवाद सध्यातरी ऐकण्यास न्यायाधीशांनी नकार दिला. दुसरीकडे, आरोपीचे वकील मंजुनाथ जी. एल. यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, “हे केवळ तांत्रिक कारणांमुळे आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे प्रकरण असून पोलिसांनी स्वतःहून (सुमोटो) गुन्हा दाखल केला आहे. कोणत्याही ग्राहकाने तक्रार केलेली नाही, त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. विरोधक चुकीची माहिती पसरवत असून आम्ही जामिनासाठी अर्ज केला आहे.”

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *