Monday , September 21 2026
Breaking News

कंग्राळी बुद्रुकमध्ये ट्रक चालकाचा संशयास्पद मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : तालुक्यातील कंग्राळी बुद्रुक येथे सोमवारी सकाळी एका ट्रकचालकाचा मृतदेह त्याच्याच ट्रकमध्ये आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. गजानन वामन हुरुडे (रा. कलमेश्वर गल्ली) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गजानन हुरुडे यांनी रविवारी रात्री आपला ट्रक कलमेश्वर को-ऑपरेटिव्ह सोसायटीसमोर उभा केला होता. त्यानंतर ते वाहनातच झोपले होते. सोमवारी सकाळी बराच वेळ हालचाल दिसून न आल्याने स्थानिक नागरिकांनी ट्रकजवळ जाऊन पाहिले असता ते बेशुद्ध अवस्थेत आढळले. यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली.

घटनास्थळी काकती पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात हलविण्यात आला.

दरम्यान, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून शवविच्छेदन अहवालानंतरच याबाबत माहिती समोर येणार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून काकती पोलीस अधिक तपास करत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *