Monday , September 21 2026
Breaking News

मानस फुटबॉल अकादमीला विजेतेपद

Spread the love

 

बेळगाव : कलिंगड गोवा येथे बडोदा फुटबॉल अकादमी गुजरात आयोजित स्पोर्टिंग गोवा फुटबॉल फेस्टिवल अंतर्गत झालेल्या 14 वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत बेळगांवच्या मानस फुटबॉल अकादमीने सोलापूरच्या समर्थ क्रीडा फुटबॉल क्लबला नमवित या स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले.
उपांत्य सामन्यात मानस फुटबॉल अकादमीने एमबीबीएस गोवा क्लबचा 4-0 असा पराभव केला विजयी संघाच्या हुसेन जमादार, हुजेफा अथणी, फैजान शेख प्रणव पिल्ले यांनी प्रत्येकी 1 गोल केला.
अंतिम सामन्यात मानस फुटबॉल अकादमीने समर्थ क्रीडा फुटबॉल क्लब सोलापूर अकादमीचा 4-0 असा पराभव केला, विजयी संघाच्या हुजेफा अथणी, हुसेन जमादार, अनिकेत पाटील, फौजन शेख यांनी प्रत्येकी 1 गोल केला.
विजेत्या मानस फुटबॉल अकादमी संघात अनिकेत पाटील, हुसेन जमादार, हुजेफा अथणी, प्रणव पिल्ले, अमोघ तलवार, आर्या कंग्राळकर, मानव शिंदे, फौजन शेख, प्रणव पिल्ले या खेळाडूंचा संघात समावेश होता. विजेत्या संघाला प्रशिक्षक मानस नायक, रवी मालशेट यांचे मार्गदर्शन व पालक वर्गांचे प्रोत्साहन लाभत आहे.
प्रमुख पाहुणे बडोदा फुटबॉल अकादमीचे संचालक संदीप देसाई यांच्या हस्ते विजेत्या मानस फुटबॉल अकादमीला संघाला आकर्षक चषक प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *