Monday , May 25 2026
Breaking News

फायटर्सने कोरले ‘अरिहंत’ चषकावर नाव

Spread the love

 

राजमनी ट्रॅव्हल्स उपयोजिता; व्हॉलीबॉल स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्री बालवीर स्पोर्ट्स क्लबच्यावतीने आयोजित ‘अरिहंत चषक’ व्हॉलीबॉल लीग स्पर्धेच्या अंतिम सामना राजमनी ट्रॅव्हल्स व नितीन शिंदे फायटर्स या दोन संघांमध्ये झाला. यावेळी झालेल्या सामन्यात ३ विरुद्ध १ सेटने नितीन फायटर्स संघाने विजय संपादन करून अरिहंत चषकावर आपले नाव कोरले. या संघाला प्रथम क्रमांकाचे १५ हजार रुपयांचे रोख बक्षीस व अरिहंत चषक देण्यात आले.
या स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे १० हजार रुपयांचे व चषक राजमनी ट्रॅव्हर्स या संघाने मिळवले. तर तृतीय क्रमांकाचे ७ हजारचे बक्षीस व चषक नटराज फायटर या संघाने पटकाविले. तृतीय क्रमांकासाठी नटराज फायटर व सुरज राठोड वॉरियर्स या संघात सामना झाला. हा सामना नटराज फायटर संघाने दोन एक सेटनी जिंकला. तर प्रथम व व्दितीय क्रमांकासाठी राजमनी ट्रॅव्हल्स व नितीन शिंदे फायटर्स या संघात ३ सामने खेळविण्यात आले. यामध्ये पहिल्या झालेल्या सामन्यात नितीन शिंदे फायटर्स संघाने २५-२३ गुण मिळवीत तर द्वितीय सामन्यात राजमनी ट्रॅव्हर्सने १८-२५ तर तृतीय सामन्यात नितीन शिंदे फायटर्स संघाने राजमनी ट्रॅव्हर्स विरोधात १५-११ गुण घेत २ सेटपैकी १ सेटने हा सामना जिंकला.
व्यक्तिगत खेळाडूंच्या मध्ये मॅन ऑफ द टूर्नामेंट अमोल जाधव हा खेळाडू ठरला. बेस्ट स्मॅशर कृपेश पाटील, बेस्ट लिफ्टर मयूर आजरेकर, व बेस्ट डिफेंडर आदित्य जाधव हे ठरले. बक्षीस वितरण सहकाररत्न उत्तम पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झाले. उत्तम पाटील यांनी अरिहंत उद्योग समूहा तर्फे निपाणी व परिसरातील क्रीडा क्षेत्राच्या प्रगतीसाठी नेहमीच सहकार्य केले आहे. भविष्यात परिसरामध्ये क्रीडा संस्कृती वाढवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगीतले.
श्री बालवीर स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष पुष्कराज तारळे यांनी स्वागत केले. यावेळी प्रतीक शहा, दिलीप पठाडे, गणेश कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले क्लबचे उपाध्यक्ष प्रा. शिवाजी मोरे व सचिव प्रा.बाळासाहेब सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक तर भैय्या कडगावे यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमास माजी नगरसेवक रवींद्र शिंदे, बळीराम भराडे, कांतीलाल राठोड, प्रा. आर. के. दिवाकर, सुधाकर माने, दोस्त महम्मद पठाण, शेरू बडेघर, इमाम बागवान, अजित बगाडे, कपिल शिंदे, इम्रान मकानदार, शिरीष कमते यांच्यासह नागरिक उपस्थित होते. दीपक चव्हाण, अनिल देवडकर, भालचंद्र आजरेकर, दत्ता ढेंगे, मारिया सुतार, गौरव बोरगावे यांनी पंच म्हणून काम पाहिले. क्लबचे खजिनदार अजय जाधव यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

आप्पाचीवाडी पुलासाठी आरपारची लढाई; रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार

Spread the love  २८ रोजी पाटबंधारेसह तालुका पंचायत कार्यालयाला टाळे ठोकणार निपाणी (वार्ता) : आप्पाचीवाडी, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *