Sunday , September 20 2026
Breaking News

अरिहंत साखर कारखान्यास अत्युत्तम तांत्रिक साखर कारखाना पुरस्कार प्रदान

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : जैनापूर येथील अरिहंत साखर कारखान्याने आपल्या उत्कृष्ट तांत्रिक कामगिरीच्या जोरावर ‘अत्युत्तम तांत्रिक साखर कारखाना’ हा मानाचा पुरस्कार पटकावला आहे. राज्याच्या साखर उद्योगात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल बेळगाव येथील एस. निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे साखर मंत्री शिवानंद पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. खाजगी साखर कारखान्यातील पुरस्कारासाठी अरिहंत शुगरची एकमेव निवड झाल्याने कारखान्याच्या कार्याबद्दल कौतुक करण्यात येत आहे.
यावेळी साखर मंत्री शिवानंद पाटील म्हणाले, अरिहंत शुगर्सकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि कार्यक्षम व्यवस्थापन आहे. त्यामुळे कारखाना इतरांसाठी आदर्श ठरला आहे.
कारखान्याने ऊस गाळप, -साखर उत्पादन, ऊर्जा बचत, पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर, उत्पादन प्रक्रियेतील पारदर्शकता जपल्याचे सांगितले.
कारखान्याचे अध्यक्ष उत्तम यांनी, या पुरस्कारामुळे कारखान्याच्या कार्याला नवे बळ मिळणार असून भविष्यातही अशीच प्रगती कायम राखण्याचा पाटील विश्वास व्यक्त केला. यावेळी जमखंडीचे आमदार जगदीश गुडगुंटी, ऊस आयुक्त गोविंद रेड्डी, संचालक गोपाल राजू, रामन्ना कट्टी, कारखान्याचे सीईओ महावीर पाटील, एच. आर. सचिन हंचनाळे, आप्पासाहेब केस्ते यांच्यासह विविध खात्याचे पदाधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *