Monday , September 21 2026
Breaking News

बालाजी वधू-वर केंद्राच्या मराठा वधू- वर मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

Spread the love

 

बेळगाव : बालाजी वधू-वर केंद्र, बेळगाव यांच्या वतीने रविवार दि. १७ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या मराठा वधू-वर मेळाव्यास वधू-वर, पालक आणि समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मेळाव्यास ५०० हून अधिक नागरिक उपस्थित होते.

शहरातील चव्हाट गल्ली जालगार मारुती मंदिर मंगल कार्यालय येथे पार पडलेल्या या मेळाव्याची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि श्री गणेश पूजनाने झाली. त्यानंतर उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.

मेळाव्यात वधू-वरांची ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंदणी प्रक्रिया पार पडली. व्यासपीठावरून मुला-मुलींच्या बायोडाटाचे वाचन करण्यात आले. शिक्षण, व्यवसाय, कौटुंबिक पार्श्वभूमी आणि अपेक्षा यांची माहिती दिल्याने उपस्थित पालकांना योग्य स्थळांची माहिती मिळण्यास मदत झाली.

मेळाव्यात नववधू-वरांकरीता सकाळच्या सत्रात तर पुनर्विवाह, घटस्फोटित, विधुर, विधवा आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी दुपारच्या सत्रात स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे विविध स्तरातील इच्छुकांना संवाद साधण्याची संधी मिळाली.

उपस्थित पालकांनी मेळाव्याच्या सुयोग्य नियोजनाचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे मुला-मुलींना योग्य जोडीदार शोधणे सुलभ होत असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. तर सहभागी युवक-युवतींनीही एकाच ठिकाणी अनेक स्थळांची माहिती मिळाल्याने समाधान व्यक्त केले.

समाजात वैवाहिक जुळवणीसाठी सकारात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यामुळे अनेक कुटुंबांना नव्या आशा निर्माण झाल्या. भविष्यातही असे उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात आयोजित करण्यात येतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *