Monday , September 21 2026
Breaking News

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पूर्ण वेळ डॉक्टर नियुक्त करा : राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पूर्णवेळ डॉक्टर नियुक्त करण्याबरोबरच पॅरा-मेडिकल, नर्सिंग, रेडिओलॉजिकल सेवेसह कर्मचारी वर्गाची संख्या वाढवावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार), बेळगाव जिल्हा शाखेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) बेळगाव जिल्हा शाखेचे अध्यक्ष दुर्गेश मेत्री यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज बुधवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

निवेदन सादर केल्यानंतर बोलताना अध्यक्ष दुर्गेश मेत्री म्हणाले की, बेळगाव ही आपल्या राज्याची उपराजधानी असून त्या अनुषंगाने येथे एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे. तथापि या हॉस्पिटलसह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. या हॉस्पिटलमध्ये डी ग्रुप कर्मचाऱ्यांना व्यवस्थित पगार दिला जात नाही. या गोष्टींचा परिणाम तेथील वैद्यकीय सेवेवर होत आहे. तेंव्हा याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन या सरकारी हॉस्पिटलमध्ये प्रत्येक विभागात विशेष करून प्रसूती विभागात 24 तास डॉक्टर उपलब्ध ठेवावेत. एकंदर सिव्हिल हॉस्पिटलच्या माध्यमातून लोकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळावी अशी आमची मागणी आहे, असे मेत्री यांनी सांगितले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शप) जिल्हा सचिव महांतेश कोळूचे, माजी जिल्हाध्यक्ष राजू पाटील, ॲड. रमेश चौगुले, ॲड. वैभव कुट्रे, राजदिल जमादार, प्रसाद मरगाळे, हरी पवार, ओमकार काकतीकर आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *