Sunday , July 26 2026
Breaking News

फळे तुम्ही खा, बिया आम्हाला द्या

Spread the love

 

भूमी वात्सल्य संस्थेचे आवाहन : सिडबॉल निर्मितीचा उपक्रम

निपाणी (वार्ता) : सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या येथील भूमी वात्सल्य संस्था आणि सृष्टी पर्यावरण संघटनेच्या संयुक्त विद्यमाने फळ आणि झाडांच्या बिया एकत्रित करून त्याचे ‘सीड बॉल’ बनवण्याचा उपक्रम राबवला जाणार आहे. त्यामुळे ‘तुम्ही भरपूर फळ खा, बिया मात्र आम्हाला द्या’, या ध्येय वाक्या अनुसरून नागरिकांनी बिया देण्याचे आवाहन दोन्ही संघटनेतर्फे करण्यात आले आहे. संस्थेच्या केंद्रावर या बिया जमा करून पर्यावरण वाढीसाठी सहकार्य केल्यास भविष्यात त्याचा सर्वांनाच लाभ होणार आहे.
शहर व परिसरात विकास कामांच्या नावाखाली अनेक वृक्ष तोडण्यात आले आहेत. पण पुन्हा वृक्ष लागवडीसाठी कुणीही पुढाकार घेतलेले नाही. परिणामी प्रदूषण आणि त्या अनुषंगाने विविध आजारही बळावत चालले आहेत. त्यावर महत्त्वाचाची उपाय योजना म्हणून या भागात मोठ्या संख्येत झाडे लावली जाणार आहेत. या सामाजिक कार्यासाठी शहर व परिसरातील नागरिकांनी फळ आणि झाडांच्या बिया एकत्रित करून त्या संस्थेकडे जमा कराव्यात. केंद्रांत जमा झालेल्या बीयांचे ‘सीड बॉल’ तयार करून त्याचे पावसाळ्यात ठिकठिकाणी रोपण केले जाणार आहे. त्यासाठी नामदेव चौगुले आणि सृष्टी पर्यावरणवादी संस्थेचे फिरोज चाऊस यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
————————————————————–
‘गेल्या पंधरा वर्षात ५ हजार पेक्षा अधिक रोपे लावले आहेत. शिवाय त्याचे संगोपन ही केले जात आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात सीबॉल तयार करून त्या रिकाम्या जागेसह डोंगराळ परिसरात टाकून वृक्षारोपण वाढवण्याचा संकल्प केला आहे.’
-नामदेव चौगुले, पर्यावरण प्रेमी शिक्षक, निपाणी

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *