Sunday , September 20 2026
Breaking News

बोरगाव अरिहंत उद्योग समूहातर्फे समाधी मठ गोशाळेला सहा टन चाऱ्याची देणगी

Spread the love

 

निपाणी( वार्ता) : उन्हाळ्यात चारा पाण्याची टंचाई भासत असून जनावरांचे हाल होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन येथील श्री वीरुपाक्षलिंग समाधी मठातील गो शाळेला बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूहातर्फे सहा टन चाऱ्याची देणगी देण्यात आली. मठाधिपती प्राणलिंग स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत सहकार रत्न उत्तम पाटील यांच्या हस्ते चारा दान करण्यात आला.
सागर श्रीखंडे यांनी स्वागत केले. उत्तम पाटील यांनी, सध्या चाऱ्याविना जनावरांचे हाल होत आहेत. समाधी मठातील प्राणलिंग स्वामी यांनी गोमातेचे जतन करण्यासाठी गोशाळा सुरू केली आहे. त्यांचा हा उपक्रम स्तुत्य असून समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि गोसेवेची भावना जपत गोसंरक्षणासाठी प्रत्येकाने सहभागी होण्याचे आवाहन केले. प्राणालिंग स्वामी यांनी, देशभरात गोमातेची संख्या कमी होत आहे. त्यामुळे प्रत्येक हिंदूंनी तिच्या रक्षणासाठी पुढे आले पाहिजे. अरिहंत उद्योग समूहाने अडचणीच्या वेळी केलेली मदत लाख मोलाची ठरल्याचे सांगितले. यावेळी माजी नगरसेवक दिलीप पठाडे, दत्ता नाईक, अनिल संकपाळ, शिरीष कमते, इम्रान मकानदार, पप्पू शिंदे, सुरज राठोड, आकाश माने, सचिन खोत, विनोद मगदूम, कृष्णात देसाई यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *