Monday , September 21 2026
Breaking News

बेळगावात बांगलादेशी घुसखोरांच्या संशयावरून पोलिसांकडून २० हून अधिक जणांची चौकशी

Spread the love

 

 

बेळगाव : शहरात बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोर असल्याच्या संशयावरून बेळगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत केंद्रीय बसस्थानकातून २० हून अधिक जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, हुबळी येथून तीन बसमधून काही संशयित व्यक्ती बेळगाव शहरात आल्याची माहिती मिळाली होती. याबाबत संशय व्यक्त झाल्यानंतर पोलिस यंत्रणा सतर्क झाली आणि तातडीने कारवाई सुरू करण्यात आली.

ताब्यात घेतलेल्या सर्वांना माळमारुती पोलीस ठाण्यात नेऊन सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान संबंधित कामगारांनी, “आम्ही बांगलादेशी नसून पश्चिम बंगालमधील रहिवासी आहोत. शहापूर येथे कामगार म्हणून काम करत आहोत. मतदानासाठी गावी गेलो होतो, आता पुन्हा कामासाठी परतलो आहोत,” असे सांगितले.

यानंतर पोलिसांनी आधार कार्ड, मतदान ओळखपत्र तसेच मोबाईल माहितीची पडताळणी केली. प्राथमिक तपासात सर्व कागदपत्रे खरी असल्याचे आढळून आले. अतिरिक्त खबरदारी म्हणून संबंधितांच्या बोटांचे ठसेही घेण्यात आले.

प्राथमिक तपासात कोणतीही संशयास्पद बाब आढळून न आल्याने सर्वांना सोडून देण्यात आले असून, कागदपत्रांची अंतर्गत पडताळणी प्रक्रिया अद्याप सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *