Sunday , September 20 2026
Breaking News

गणपत गल्ली परिसरात पुन्हा अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम

Spread the love

 

बेळगाव : शहरातील अत्यंत वर्दळीच्या गणपत गल्ली परिसरात शनिवारी सकाळी बेळगाव महापालिकेने अतिक्रमणाविरोधात पुन्हा एकदा जोरदार मोहीम राबवत रस्ते मोकळे केले. रहदारी पोलिसांच्या सहकार्याने पार पडलेल्या या कारवाईमुळे परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली.

गणपत गल्ली ही बेळगावच्या मुख्य बाजारपेठांपैकी एक महत्त्वाची व्यापारी गल्ली मानली जाते. दररोज हजारो नागरिक आणि वाहनांची ये-जा असलेल्या या भागात काही फेरीवाले व दुकानदारांनी रस्त्यावर स्टॉल, हातगाड्या आणि विविध साहित्य ठेवून अतिक्रमण केल्याने वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला होता. नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत असल्याने महापालिकेने तातडीने कारवाईचा निर्णय घेतला.

शनिवारी सकाळी महापालिकेचे अतिक्रमण हटाव पथक अचानक गणपत गल्लीत दाखल झाले. सुरुवातीला विक्रेत्यांना समज देत स्वखुशीने अतिक्रमण हटविण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र त्यानंतरही रस्त्यावर ठेवलेले टेबल, फळ-भाजीपाला गाड्या, प्लास्टिक साहित्य व इतर अडथळे हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. काही ठिकाणी कारवाईला विरोध झाल्याने संबंधितांचे साहित्य जप्त करण्यात आले.

कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांनी फेरीवाल्यांना नियमानुसार परवाना घेऊनच व्यवसाय करण्याचा सल्ला दिला. तसेच भविष्यात पुन्हा अतिक्रमण आढळल्यास दंडात्मक कारवाईसह कठोर पावले उचलली जातील, असा इशाराही देण्यात आला.

महापालिकेच्या या धडक मोहिमेनंतर गणपत गल्लीतील वाहतूक सुरळीत झाली असून स्थानिक नागरिक, व्यापारी आणि वाहनचालकांनी समाधान व्यक्त करत प्रशासनाच्या कारवाईचे स्वागत केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *