Monday , September 21 2026
Breaking News

शहापूरच्या शिवा लोहार यांना पुन्हा मिळाली दृष्टी

Spread the love

 

बेळगाव : अडीच महिन्यांपूर्वी फटाक्यांच्या भीषण दुर्घटनेत दोन्ही डोळ्यांची दृष्टी गमावलेल्या शहापूर येथील भारतनगरमधील शिवा नारायण लोहार यांना उपचारांनंतर एका डोळ्याची दृष्टी पुन्हा प्राप्त झाली आहे. या सकारात्मक घडामोडीमुळे कुटुंबीयांसह परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

दुर्घटनेनंतर शिवा लोहार यांच्यावर बेळगाव येथील केएलई हॉस्पिटल, मुंबईतील जे. जे. हॉस्पिटल तसेच हैदराबाद येथील एल. व्ही. प्रसाद नेत्र रुग्णालय येथे विशेष उपचार करण्यात आले. डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे आणि वेळेत मिळालेल्या वैद्यकीय मदतीमुळे एका डोळ्याची दृष्टी परत मिळवण्यात यश आले.

दरम्यान, हैदराबाद येथील एल. व्ही. प्रसाद आय इन्स्टिट्यूटमध्ये तातडीने अपॉइंटमेंट मिळवून देण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष अधिकारी मंगेश चिवटे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच धैर्यशील माने यांनी शिफारस पत्र देऊन सहकार्य केले.

मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे रामेश्वर नाईक, महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, रमाकांत कोंडुसकर, अनिल आंबरोळे, रणजित चव्हाण-पाटील, विकास कलघटगी, नगरसेवक रवी साळुंखे, दिगंबर पवार, बाबू कोल्हे, श्रीधर खन्नुकर, अमित जाधव, विजय हंडे, बाळू जोशी आणि राजेंद्र बैलूर यांनीही उपचारासाठी विविध स्तरांवर मदतीचा हात दिला.

शिवा लोहार यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून पुढील उपचार सुरू असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *