Sunday , September 20 2026
Breaking News

जयनगर-हुंचेनहट्टी खूनप्रकरणी २४ तासांत पोलिसांची मोठी कारवाई; ५ आरोपी गजाआड

Spread the love

 

बेळगाव : बेळगावजवळील हुंचेनहट्टी गावाच्या शिवारात सेकंड हँड कारच्या पैशांच्या व्यवहारातून झालेल्या वादाचे रूपांतर थेट खुनात झाले असून, या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी अवघ्या २४ तासांत ५ आरोपींना अटक करत मोठी कारवाई केली आहे.

या घटनेत मजगाव येथील राहुल तळवार (वय २२) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, सेकंड हँड कार खरेदी करून ती परत केल्यानंतर पैशांच्या देवाणघेवाणीवरून राहुल आणि आरोपींमध्ये वाद निर्माण झाला होता. याच पूर्ववैमनस्यातून आरोपी मंजुनाथ शितीमणी आणि त्याच्या साथीदारांनी राहुलला हुंचेनहट्टी परिसरातील निर्जन ठिकाणी बोलावून घेतल्याचा आरोप आहे.

तेथे राहुलवर तलवार आणि अन्य घातक शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात राहुलच्या डोक्यावर व हातावर गंभीर जखमा झाल्या. जखमी अवस्थेत त्याला तातडीने बिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

घटनेनंतर बेळगाव ग्रामीण पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवत अवघ्या २४ तासांत ५ आरोपींना अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, “राहुलचा कोणत्याही वादाशी संबंध नव्हता. केवळ द्वेषातून त्याची हत्या करण्यात आली. आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे,” अशी मागणी राहुलच्या कुटुंबीयांनी केली आहे. राहुलला फसवून बोलावून हत्या करण्यात आल्याचा आरोपही नातेवाईकांनी केला आहे.

या संदर्भात बोलताना भूषण बोरसे यांनी सांगितले की, सेकंड हँड कारच्या व्यवहारातील पैशांच्या वादातून ही घटना घडली असून, पोलिसांनी जलद कारवाई करत आरोपींना अटक केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *