Sunday , July 26 2026
Breaking News

पोक्सो प्रकरणातील साक्षीदाराला धमकी देणारा युवक गजाआड

Spread the love

 

बेळगाव : पोक्सो प्रकरणातील साक्षीदाराला जीवे मारण्याची धमकी देऊन न्यायालयात साक्ष देण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिरनवाडी येथील एका युवकाला उद्यमबाग पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रोहित विठ्ठल गणाचारी (वय 20, रा. सिद्धेश्वर गल्ली, पिरनवाडी, बेळगाव) असे असून, त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शांतीसागर कॉलनी, मजगाव येथील संजय परशुराम नेकनार हे मार्केट पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका पोक्सो प्रकरणातील साक्षीदार आहेत. त्यांनी उद्यमबाग पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी रोहित गणाचारी आणि त्याचा साथीदार रवी वाघमोटे यांनी न्यायालयात साक्ष दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

तसेच फिर्यादीच्या मोठ्या भावाला मारहाण करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत उद्यमबाग पोलिसांनी तत्काळ कारवाई करत रोहित गणाचारी याला अटक केली.

दरम्यान, या प्रकरणातील दुसरा संशयित रवी वाघमोटे याचा पोलिसांकडून शोध सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *