Monday , September 21 2026
Breaking News

शिवसेना उपनेते अरुणभाई दूधवाडकर यांनी शुभम शेळके यांची घेतली सदिच्छा भेट..!

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्रातील शिवसेना उपनेते, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख तसेच बेस्टचे माजी अध्यक्ष अरुणभाई दूधवाडकर यांनी आज म. ए. युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांची सदिच्छा भेट घेतली.

सिंधुदुर्ग व कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या अरुणभाई दूधवाडकर यांनी आज शनिवारी बेळगावला धावती भेट दिली. यावेळी त्यांनी शुभम शेळके यांच्या निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीप्रसंगी झालेल्या चर्चेत अध्यक्ष शुभम शेळके व आम्ही पदाधिकाऱ्यांनी बेळगावात चाललेल्या कन्नड सक्तीबद्दल, त्याच बरोबर बेळगाव महापालिकेकडून होणाऱ्या घटना बाह्य कारवायाबद्धल माहिती अरुणभाई दूधवाडकर यांना दिली. त्यावेळी शुभम शेळके यांचा निरोप उद्धवसाहेबांपर्यंत पोहचवण्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच शिवसेना व उद्धव साहेब सीमावासियांच्या पाठीशी ठामपणे उभे होते, आहेत आणि राहतील, असा शब्दही अरुणभाई दूधवाडकर यांनी दिला. याप्रसंगी म. ए. युवा समिती सीमाभागचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *