Monday , September 21 2026
Breaking News

‘युवा द चेंज मेकर’ उपक्रमाची यशस्वी सांगता

Spread the love

 

बेळगाव : संस्कृती एज्युकेअरतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘युवा द चेंज मेकर’ या युवक विकास उपक्रमाची नुकतीच यशस्वी सांगता झाली. युवकांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांना कौटुंबिक, सामाजिक, शैक्षणिक तसेच व्यक्तिमत्त्व विकासाशी संबंधित विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

आजच्या बदलत्या आणि स्पर्धात्मक युगात युवकांचा विकास केवळ शैक्षणिक यशापुरता मर्यादित नसून भावनिक स्थैर्य, मानसिक आरोग्य, जीवनकौशल्ये आणि करिअर नियोजन यांनाही तितकेच महत्त्व आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. विविध तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या क्षमतांची जाणीव करून देत भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्याची प्रेरणा मिळाली.

उपक्रमातील संवादात्मक सत्रे विशेष आकर्षण ठरली. या सत्रांमधून युवकांना मुक्तपणे व्यक्त होण्याची संधी मिळाली. विचारांची देवाणघेवाण, अनुभवांचे आदानप्रदान आणि विविध विषयांवरील चर्चेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत झाली.

उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहभागी विद्यार्थी, पालक, तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. रुपा गणेशवाडी, डॉ. बिरादार, अनिलकुमार आर. तसेच स्वयंसेवक आणि संस्कृती एज्युकेअरच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *