Sunday , July 26 2026
Breaking News

मराठी शाळा कंग्राळी खुर्दच्या शताब्दी महोत्सवात 1981-88 बॅचची विक्रमी देणगी

Spread the love

 

बेळगाव : मराठी शाळा, कंग्राळी खुर्द (ता. व जि. बेळगाव) शतक महोत्सवी सोहळ्याला माजी विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ३० व ३१ मे रोजी संपन्न झालेला हा सोहळा “न भूतो न भविष्यति” असा अविस्मरणीय ठरला.

शाळेच्या 1981 ते 1988 या बॅचमधील सुमारे 53 माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी एकत्र येत शताब्दी महोत्सव समितीकडे तब्बल 60 हजार 19 रुपयांची रोख देणगी सुपूर्द केली. शाळेच्या विविध बॅचमधून जमा झालेल्या देणग्यांमध्ये ही सर्वाधिक देणगी ठरल्याने या बॅचचे विशेष कौतुक करण्यात आले.

या निधी संकलनासाठी बॅचचे ग्रुप ॲडमिन रणजित कृष्णाजी पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांना महेश जगताप, विलास पाटील, जयंत पाटील, राजू बेन्नाळकर, राजेश जाधव, कांचन पाटील तसेच इतर सहकाऱ्यांची मोलाची साथ लाभली.

महोत्सवादरम्यान माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी आपल्या शालेय जीवनातील अनेक आठवणींना उजाळा दिला. माजी विद्यार्थिनी सीमा बाळेकुंद्री तसेच किसन पाटील, कल्लोजी पाटील आणि ज्योतिकुमार पाटील यांनी मनोगत व्यक्त करत शाळेशी असलेल्या भावनिक नात्याचा उल्लेख केला.

यावेळी माजी शिक्षकांसोबत दोन दिवस घालवत जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. त्यामुळे अनेकांनी पुन्हा एकदा आपले शालेय जीवन अनुभवत असल्याची भावना व्यक्त केली. दोन दिवस चाललेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही या बॅचच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

शाळेच्या शंभर वर्षांच्या गौरवशाली प्रवासाचा साक्षीदार ठरलेला हा शताब्दी महोत्सव उपस्थितांच्या कायम स्मरणात राहील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *