Sunday , September 20 2026
Breaking News

वडगाव श्री मंगाई देवी यात्रोत्सव 11 ऑगस्ट रोजी

Spread the love

 

बेळगाव : वडगाव परिसरातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री मंगाई देवी यात्रोत्सवावर यंदा अधिक मासाचा प्रभाव पडला असून यात्रोत्सव तब्बल एक महिना उशिराने साजरा केला जाणार आहे. त्यामुळे दरवर्षी जुलै महिन्यात होणारा हा पारंपरिक उत्सव यंदा 11 ऑगस्ट 2026 रोजी संपन्न होणार आहे.

हिंदू पंचांगानुसार तीन वर्षांतून एकदा येणाऱ्या अधिक मासामुळे यंदा अनेक धार्मिक सण, उत्सव आणि यात्रा पुढे ढकलल्या गेल्या आहेत. त्याचाच परिणाम श्री मंगाई देवी यात्रोत्सवावरही झाला आहे. दरवर्षी जून महिन्यात देवीला गाऱ्हाणे घालण्याची परंपरा असून त्यानंतर जुलैमध्ये यात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडतो. मात्र यंदा धार्मिक दिनदर्शिकेतील बदलामुळे उत्सवाचे वेळापत्रक एक महिना पुढे गेले आहे.

परंपरेनुसार 10 जुलै 2026 रोजी देवीला गाऱ्हाणे घालण्यात येणार असून त्याच दिवसापासून देवीचे वार पाळण्यास सुरुवात होईल. भाविकांकडून श्रद्धापूर्वक मंगळवार व शुक्रवार हे वार पाळले जाणार आहेत. त्यानंतर महिनाभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून 11 ऑगस्ट रोजी यात्रोत्सवाचा मुख्य सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे.

वडगावसह बेळगाव शहर आणि परिसरातील हजारो भाविकांसाठी मंगाई देवी यात्रा हा श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचा महत्त्वाचा उत्सव मानला जातो. यात्रोत्सवाच्या निमित्ताने देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. यंदाही उत्सव भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी मंदिर समितीकडून नियोजन सुरू करण्यात आले असून विविध सुविधांची पूर्वतयारी केली जात आहे.

अधिक मासामुळे यात्रोत्सवाची तारीख पुढे गेली असली तरी भाविकांच्या भक्तीभावात कोणतीही कमी नसून, श्री मंगाई देवी यात्रोत्सवाची आतापासूनच उत्सुकता आणि प्रतीक्षा लागून राहिली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *