Saturday , August 22 2026
Breaking News

सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या बेळगाव चॅप्टरचे उद्घाटन; उद्योजकांसाठी नवे व्यासपीठ

Spread the love

 

बेळगाव : मराठी उद्योजकांना एकत्र आणून व्यवसायवृद्धी, नेटवर्किंग आणि मार्गदर्शनाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट (SCGT) च्या बेळगाव चॅप्टरचे उद्घाटन टिळकवाडी येथील ट्रीहाऊस हॉटेलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या चॅप्टरमुळे बेळगाव आणि परिसरातील उद्योजक, व्यावसायिक तसेच नवउद्योजकांना व्यवसाय विस्तारासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. उद्घाटन सोहळ्यास सॅटर्डे क्लबचे सेक्रेटरी जनरल सुहास फडणीस, डेप्युटी सेक्रेटरी जनरल महेश इनामदार, विभागप्रमुख योगेश देशपांडे, ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. सुधीर चव्हाण, गडहिंग्लज विभागाचे।विभागप्रमुख जितेंद्र रननावरे तसेच डेप्युटी विभागप्रमुख डॉ. संदीप पाटील यांच्यासह बेळगावातील विविध क्षेत्रांतील उद्योजक आणि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सॅटर्डे क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेत मराठी उद्योजकांनी परस्पर सहकार्याच्या माध्यमातून व्यवसाय वृद्धी साधण्याची गरज अधोरेखित केली. उद्योजकांना व्यापक बाजारपेठ, व्यावसायिक संपर्क आणि अनुभवांची देवाणघेवाण यासाठी सॅटर्डे क्लबचे व्यासपीठ उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बेळगाव चॅप्टरच्या माध्यमातून उद्योजकांना अनुभवी व्यावसायिकांचे मार्गदर्शन, प्रशिक्षण तसेच रेफरल सिस्टीमद्वारे नवीन व्यावसायिक संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. सदस्यांमधील व्यावसायिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी नियमित बैठका आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

यावेळी बेळगाव चॅप्टरच्या मुख्य सहाय्यक टिमची (CST) ची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये अध्यक्ष म्हणून रोहन कुंडेकर, सेक्रेटरी म्हणून प्रथमेश कारेकर आणि खजिनदार म्हणून दीपाली वनकुंद्रे यांची निवड करण्यात आली.

उद्घाटन सोहळ्यास मॅन्युफॅक्चरिंग, आयटी, बांधकाम, सेवा आणि किरकोळ व्यवसाय क्षेत्रातील अनेक उद्योजकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. परस्पर सहकार्य, व्यावसायिक वाढ आणि नवीन संधींच्या शोधासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार उपस्थित सदस्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन जोतिबा कडेमनी आणि डॉ. अमोल पाटील यांनी केले. सकारात्मक वातावरणात संपन्न झालेला हा उद्घाटन सोहळा बेळगावच्या उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रासाठी आशादायी पाऊल मानला जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

कर्जाच्या विळख्यात विणकर कामगाराची जीवनयात्रा संपली; राहुल जारकीहोळींकडून कुटुंबाला धीर

Spread the love  बेळगाव : कर्जबाजारीपणाच्या आर्थिक विवंचनेतून मंगाईनगर, वडगाव येथील एका विणकर कामगाराने गळफास …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *