Sunday , August 23 2026
Breaking News

बेळगावमध्ये पोलिसांची धडक मोहीम; जुगार आणि अंमली पदार्थ प्रकरणात चौघांना अटक

Spread the love

 

बेळगाव : शहरात बेकायदेशीर जुगार आणि अंमली पदार्थांच्या सेवनाविरोधात पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेत तीन वेगवेगळ्या कारवायांद्वारे चौघांना अटक करण्यात आली आहे. संबंधित आरोपींविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संतोष दळवाई आणि त्यांच्या पथकाने केएसआरपी दुसऱ्या बटालियनजवळ छापा टाकून सार्वजनिक ठिकाणी ओसी जुगार खेळवणाऱ्या नवीन हनुमंत कडकौळ याला ताब्यात घेतले. कारवाईदरम्यान त्याच्याकडून रोकड व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दरम्यान, मार्केट पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने भांदूर गल्ली परिसरात संशयास्पद हालचाली करणाऱ्या समर्थ भगवंत नवली या तरुणाची चौकशी केली. वैद्यकीय तपासणीत त्याने गांजाचे सेवन केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

तसेच शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस. एस. सीमानी यांच्या पथकाने फाटण शोरूम परिसरात कारवाई करत अंमली पदार्थांचे सेवन केल्याच्या आरोपावरून शंकर मारुती गोल्लर आणि सदाशिव गौरेश पुजारी या दोघांना अटक केली. वैद्यकीय तपासणीत अंमली पदार्थ सेवनाची पुष्टी झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

शहरातील बेकायदेशीर कृत्यांवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून अशा प्रकारच्या मोहिमा सातत्याने राबविल्या जात असून या यशस्वी कारवाईबद्दल बेळगावचे पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्यांकडून सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

राष्ट्रीय सब ज्युनिअर जलतरण स्पर्धेत बेळगावच्या दिशा होंडीला एक सुवर्ण, दोन रौप्य पदके

Spread the love  बेळगाव : नुकत्याच जयपुर येथे झालेल्या 42 व्या राष्ट्रीय सब ज्युनिअर जलतरण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *