Sunday , August 23 2026
Breaking News

धर्मस्थळाविरुद्ध कारस्थान करणाऱ्यांवर कारवाईची मागणी; प्रमोद मुतालिक यांची टीका

Spread the love

 

बेळगाव : धर्मस्थळ क्षेत्र आणि हिंदू धर्माविरुद्ध पद्धतशीर कारस्थान सुरू असल्याचा आरोप करत श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक यांनी अभिनेते प्रकाश राज आणि प्राध्यापक भगवान यांच्यावर तीव्र टीका केली. धार्मिक भावना दुखावणाऱ्यांविरुद्ध सरकारने कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मुतालिक यांनी धर्मस्थळ प्रकरणातील एसआयटी अर्जाच्या संदर्भाने प्रकाश राज यांच्यावर निशाणा साधला. धार्मिक विषयांमध्ये हस्तक्षेप करून त्यांनी हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करत चित्रपटसृष्टीने त्यांच्यावर बहिष्कार टाकावा, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी त्यांनी एका अन्य घटनेचाही उल्लेख करत धार्मिक प्रतीकांबाबत अवमानकारक कृती केल्याने समाजाच्या श्रद्धेला ठेच पोहोचत असल्याचे सांगितले. तसेच हरिहर येथे प्रभू श्रीरामांबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्राध्यापक भगवान यांच्याविरोधात सरकारने गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

सरकारने योग्य ती कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही मुतालिक यांनी दिला. या पत्रकार परिषदेला राजू पवार, शिवराज अंबारी यांच्यासह श्रीराम सेनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

राष्ट्रीय सब ज्युनिअर जलतरण स्पर्धेत बेळगावच्या दिशा होंडीला एक सुवर्ण, दोन रौप्य पदके

Spread the love  बेळगाव : नुकत्याच जयपुर येथे झालेल्या 42 व्या राष्ट्रीय सब ज्युनिअर जलतरण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *