Sunday , August 23 2026
Breaking News

शहापूरात श्री महालक्ष्मी देवीचा ११४ वा जन्मोत्सव उत्साहात; भाविकांची मोठी गर्दी

Spread the love

 

बेळगाव : शहापूर येथील बसवण गल्ली परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला, निमित्त होते श्री महालक्ष्मी देवीच्या ११४ व्या जन्मोत्सव सोहळ्याचे. धार्मिक परंपरा, श्रद्धा आणि उत्साह यांचा संगम असलेल्या या सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत देवीचे दर्शन घेतले.

जन्मोत्सवानिमित्त पहाटेपासूनच मंदिर परिसरात विविध धार्मिक विधी, पूजाअर्चा आणि मंत्रोच्चारांनी वातावरण मंगलमय झाले होते. त्यानंतर गणेशपूर गल्ली आणि बसवण गल्ली या प्रमुख मार्गांवरून पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि जयघोषात भव्य कुंभ मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमुळे परिसरात भक्तीमय उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

कुंभ मिरवणुकीनंतर श्री महालक्ष्मी देवीची पालखी मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक रितीरिवाजांनुसार धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. दुपारी महाआरती झाल्यानंतर उपस्थित हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

यावेळी भाविकांनी श्री महालक्ष्मी देवीचा ११४ वा जन्मोत्सव साजरा होत असल्याबद्दल समाधान आणि आनंद व्यक्त केला. अनेक भाविकांनी देवीचे दर्शन घेऊन कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.

हा यात्रोत्सव यशस्वी करण्यासाठी पुजारी कुटुंबीय, उत्सव समितीचे कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या सहकार्यामुळे संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. कार्यक्रमासाठी शहापूरसह शहराच्या विविध भागांतून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावल्याने परिसरात उत्सवाचे चैतन्य पाहायला मिळाले.

About Belgaum Varta

Check Also

राष्ट्रीय सब ज्युनिअर जलतरण स्पर्धेत बेळगावच्या दिशा होंडीला एक सुवर्ण, दोन रौप्य पदके

Spread the love  बेळगाव : नुकत्याच जयपुर येथे झालेल्या 42 व्या राष्ट्रीय सब ज्युनिअर जलतरण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *