Thursday , August 20 2026
Breaking News

महात्मा गांधी संस्थेतर्फे मुख्याध्यापक अविनाश कांबळे यांचा सन्मान

Spread the love

 

कावळेवाडी.. येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे नुकताच मुख्याध्यापक पदी बढती मिळून कावळेवाडी प्राथमिक शाळेत रुजू झाल्याबद्दल विद्यार्थी प्रिय मुख्याध्यापक अविनाश कांबळे यांचा संस्था अध्यक्ष वाय पी नाईक यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष ऍड. नामदेव मोरे होते.
हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात प्राथमिक शाळेत संपन्न झाला.
प्रारंभी विद्यार्थ्यिनिनी स्वागत गीत सादर केले.
यावेळी पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प व शालेय पुस्तके व भेट वस्तू देऊन स्वागत केले.
विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापक अविनाश कांबळे यांची तेवीस वर्षे सेवा झाली. नोकरीची सुरूवात याच शाळेतून झाली. सहा वर्षे उचगाव येथे सी आर पी म्हणून यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली नंतर ते यळेबैल शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. तेथून नुकताच मुख्याध्यापक पदी बढती मिळून कावळेवाडी शाळेत रुजू झाले.
जिथून सुरूवात झाली त्याच गावात पुन्हा मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होतानाचा आनंद, सार्थ अभिमान महात्मा गांधी संस्थेला वाटतो. एक हुषार, शिक्षणाप्रती प्रेम, पालक विद्यार्थी यांच्याशी सौहार्द नातं ठेवणारं व्यक्तिमत्त्व म्हणून विशेष ओळख निर्माण केली आहे. अशा शब्दात शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी ऍड. नामदेव मोरे यांनी शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल त्यांचाही शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
गावातील बारावी उत्तीर्ण प्रणाली कणबरकर (९३ %) व
किरण बुरुड या गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी शाळा सुधारणा कमिटीचे उपाध्यक्ष तेजस्वीनी सुतार, यल्लापा बुरुड, रघुनाथ मोरे, शशिकांत गावडे, राजाराम मोरे, एन आर मोरे, मंदिरा ओऊळकर, स्नेहल मोरे, वनिता कणबरकर तसेच ज्ञानेश्वर चिंगळे, निल्लवा हुक्केर आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वप्निल सवदी यांनी सूत्रसंचालन केले. आभार वैशाली किल्लेकर यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

हिडकल जलाशयाची सुरक्षा रामभरोसे!

Spread the love  २० हून अधिक कंत्राटी सुरक्षारक्षकांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह; मुख्य प्रवेशद्वाराची दुरवस्था, प्रवेश नियंत्रणही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *