Thursday , August 20 2026
Breaking News

वडगावातील अन्नपूर्णेश्वरी नगरमध्ये मोकाट कुत्र्यांचा त्रास; नागरिकांकडून तातडीच्या कारवाईची मागणी

Spread the love

 

बेळगाव : वडगाव परिसरातील येळ्ळूर रोड, ६ वा क्रॉस, अन्नपूर्णेश्वरी नगर येथे मोकाट कुत्रे आणि त्यांच्या पिल्लांच्या वाढत्या वावरामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. परिसरातील एका बांधकामाधीन इमारतीच्या जागेत या कुत्र्यांचा कायमस्वरूपी मुक्काम असल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, ६ व्या क्रॉसच्या आतील भागातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मोकाट कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच पादचारी यांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे आणि अचानक रस्त्यावर धावून येण्यामुळे अपघाताचा धोका देखील वाढला आहे.

या समस्येबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचा संपर्क उपलब्ध नसल्याने नागरिकांनी माध्यमांच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करून परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

महानगरपालिका आणि संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

हिडकल जलाशयाची सुरक्षा रामभरोसे!

Spread the love  २० हून अधिक कंत्राटी सुरक्षारक्षकांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह; मुख्य प्रवेशद्वाराची दुरवस्था, प्रवेश नियंत्रणही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *