Thursday , August 20 2026
Breaking News

करीकट्टी क्रॉस येथे सीसीबीची धडक कारवाई; 3 किलो गांजासह युवक अटकेत

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहर सीसीबी पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत करीकट्टी क्रॉस येथे 3 किलो गांजासह एका युवकाला अटक केली आहे. या कारवाईत गांजा, मोटारसायकल, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण रु. 1.85 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील आणखी एका संशयिताचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मृत्युंजय भीमसेप्पा जडगी (वय 19, रा. यल्लापूर, ता. हुक्केरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी विक्रीसाठी गांजा घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती सीसीबी पथकाला मिळाली होती. त्यानुसार करीकट्टी क्रॉस, भीमगड, गोकाक–बेळगाव मार्गावर सापळा रचून पोलिसांनी छापा टाकला.

सीसीबीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मंजुनाथ भजंत्री आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. छाप्यात आरोपीच्या ताब्यातून रु. 1.50 लाख किमतीचा 3 किलो गांजा, रु. 30 हजार किमतीची बजाज प्लॅटिना मोटारसायकल, एक विवो मोबाईल फोन आणि रु. 5 हजारांची रोख रक्कम जप्त करण्यात आली.

या प्रकरणी मारीहाळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 83/2026 नोंद करण्यात आला असून आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायदा कलम 20(b)(ii)(B) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून फरार संशयिताचा शोध घेतला जात आहे.

या यशस्वी कारवाईबद्दल सीसीबीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

हिडकल जलाशयाची सुरक्षा रामभरोसे!

Spread the love  २० हून अधिक कंत्राटी सुरक्षारक्षकांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह; मुख्य प्रवेशद्वाराची दुरवस्था, प्रवेश नियंत्रणही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *