Wednesday , August 19 2026
Breaking News

भारत विकास परिषदेच्या बेळगाव अध्यक्षपदी विनायक मोरे यांची तिसऱ्यांदा फेरनिवड

Spread the love

 

बेळगाव : भारत विकास परिषदेच्या बेळगाव शाखा अध्यक्षपदी विनायक मोरे यांची सर्वानुमते सलग तिसऱ्यांदा फेरनिवड करण्यात आली. दोन वर्षे उत्कृष्ट सेवाकार्य केल्यामुळे त्यांना पुन्हा अध्यक्षीय दायित्व देण्यात आले. सेक्रेटरी म्हणून के. वासुदेव प्रभू व खजिनदार म्हणून डी. वाय. पाटील यांची निवड करण्यात आली. कर्नाटक उत्तर प्रांत संगठन सचिव म्हणून बेळगाव शाखेचे विनायक घोडेकर यांना दायित्व देण्यात आले.
कार्यकारिणी सल्लागार – प्राचार्य व्ही. एन्. जोशी, डाॅ. व्ही. बी. यलबुर्गी, पांडुरंग नायक, डाॅ. जे. जी. नाईक, नामजी देशपांडे, सुहास गुर्जर, सुभाष मिराशी, सुहास सांगलीकर, व्ही. आर. गुडी, सीए श्रीनिवास शिवणगी, जयंत जोशी, कुमार पाटील, स्वाती घोडेकर.
कार्यकारी संघ – विनायक घोडेकर, ॲड. सचिन जवळी, गणपती भुजगुरव, पी. एम. पाटील, अमर देसाई, रामचंद्र तिगडी, चंद्रशेखर इटी, मालतेश पाटील, कुबेर गणेशवाडी, नामदेव कोलेकर, पी. जे. घाडी तसेच महिला प्रमुख – सुखद देशपांडे, कार्यकारिणी सदस्या प्रा. अरूणा नाईक, जया नायक, शुभांगी मिराशी, रजनी गुर्जर, विद्या इटी, लक्ष्मी तिगडी, प्रिया पाटील, स्मिता भुजगुरव, उषा देशपांडे, उमा यलबुर्गी, रोहिणी पाटील, स्नेहा सांगलीकर, तृप्ती देसाई, ॲड. बना कौजलगी, अक्षता मोरे, ज्योती प्रभू, नंदिनी पाटील, ज्योत्स्ना गिलबिले, मंगला कुलकर्णी.
भारत विकास परिषदेतर्फे प्रतिवर्षी अनेक सामाजिक- सांस्कृतिक- शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. यामध्ये प्रामुख्याने विकलांग सहाय्यता, मोफत आरोग्य तपासणी, ग्रामविकास, राष्ट्रीय समूहगायन स्पर्धा, भारत को जानो, प्रश्नमंजुषा स्पर्धा, गुरू वंदना व छात्र अभिनंदन, झाडे लावा – झाडे जगवा, स्वच्छता अभियान, दहावी व बारावीतील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, सेवा तसेच संस्कार शिबिर आदिंचा समावेश आहे.

About Belgaum Varta

Check Also

भाषेच्या भिंती ओलांडून कुगजी दाम्पत्याचा मदतीचा हात; कन्नड साहित्यिकांच्या पत्नीच्या हृदयशस्त्रक्रियेसाठी 25 हजारांची मदत

Spread the love  येळ्ळूर : जात, धर्म आणि भाषेच्या भिंती बाजूला ठेवून गरजूंच्या मदतीला धावून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *