Wednesday , August 19 2026
Breaking News

ख्रिश्चन समाजाला जागा देण्यास मण्णूर ग्रामस्थांचा विरोध

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील मण्णूर गावातील एका एकर जागेवर मारिया कृपा सोसायटीच्या नावाचा फलक लावण्यात आल्याने गावात वाद निर्माण झाला असून, संबंधित जागा ख्रिश्चन समाजासाठी देण्याच्या कथित निर्णयाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.

या पार्श्वभूमीवर देवसकी पंच कमिटी, मण्णूर यांच्या वतीने आयोजित बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मण्णूरचे तलाठी महेंद्र पत्तार तसेच आंबेवाडी ग्रामपंचायतीचे विकास अधिकारी चिदानंद जंबगी यांना निवेदन सादर करून ग्रामस्थांची भूमिका स्पष्ट केली.

निवेदनात मण्णूर गावात ख्रिश्चन धर्माचे पालन करणारे रहिवासी नसल्याचा दावा करण्यात आला असून, संबंधित जागा ख्रिश्चन समाजाला देण्यात येऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे. या कथित मंजुरीबाबत ग्रामस्थांमध्ये नाराजी असून प्रशासनाने याची दखल घेऊन योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली.

या बैठकीला देवसकी पंच कमिटीचे अध्यक्ष मुकुंद भावकू तरळे यांच्यासह विनय कदम, नारायण कालकुंद्री, दत्तू चौगुले, रवी चौगुले, अरुण सांबरेकर, संदीप डोणकरी, संतोष केंचन्नावर, महादेव डोणकरी, निखिल चौगुले, रामा चौगुले, दशरथ मंडोळकर, मल्लाप्पा बाळेकुंद्री, उमेश चौगुले, मारुती मंडोळकर, अजित डोणकरी, सतीश बोंगाळे, अप्पू कटगी तसेच गावातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

गुड्स शेड रस्त्याच्या कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी खासदार जगदीश शेट्टर यांना निवेदन

Spread the love  बेळगाव : बेळगाव रेल्वे स्थानकाच्या दक्षिण प्रवेशद्वाराला जोडणाऱ्या प्रमुख गुड्स शेड रस्त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *