Wednesday , August 19 2026
Breaking News

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन गटांत तुफान हाणामारी; मध्यस्थी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावरही हल्ला

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन युवकांच्या गटांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हस्तक्षेप करणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यावरही काही युवकांनी हल्ला केल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी मार्केट पोलिसांनी संबंधित सर्व संशयित युवकांना ताब्यात घेत पुढील चौकशी सुरू केली आहे.

माहितीनुसार, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर दोन गटांतील युवकांमध्ये जोरदार वाद सुरू झाला होता. भररस्त्यात झालेल्या या गोंधळामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली. त्यावेळी कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी मल्लीकार्जुन गुंजीकर यांनी तत्काळ हस्तक्षेप करून दोन्ही गटांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, वाद मिटवण्याऐवजी काही युवकांनी पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालत त्यांच्यावरच हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला. माहिती मिळताच मार्केट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालिमिर्ची आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत हुल्लडबाजी करणाऱ्या युवकांना ताब्यात घेतले. त्यानंतर सर्व संशयितांना पुढील चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

दरम्यान, दोन गटांमधील वाद नेमका कोणत्या कारणावरून झाला आणि पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करण्यामागील कारण काय होते, याचा तपास मार्केट पोलीस करत असून या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

About Belgaum Varta

Check Also

गुड्स शेड रस्त्याच्या कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी खासदार जगदीश शेट्टर यांना निवेदन

Spread the love  बेळगाव : बेळगाव रेल्वे स्थानकाच्या दक्षिण प्रवेशद्वाराला जोडणाऱ्या प्रमुख गुड्स शेड रस्त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *