Friday , June 19 2026
Breaking News

यमकनमर्डी विधानसभा मतदारसंघात एसआयआर कार्याबाबत बैठक यशस्वीरीत्या संपन्न

Spread the love

यमकनमर्डी : भारतीय जनता पक्षातर्फे चिक्कोडी जिल्हा भाजप अध्यक्ष सतीश अप्पाजीगोळ यांच्या नेतृत्वाखाली यमकनमर्डी विधानसभा मतदारसंघात विशेष मतदार यादी सघन पुनरावलोकन (Special Intensive Revision – SIR) अभियानासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. मतदार यादीचे पुनरावलोकन प्रभावीपणे राबविण्याबरोबरच बूथस्तरावरील पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

बैठकीच्या व्यासपीठावर यमकनमर्डी विधानसभा मतदारसंघाच्या एसआयआर प्रभारी तथा भाजप महिला मोर्चा कर्नाटक प्रदेश सचिव डॉ. सोनाली सरनोबत, भाजप अनुसूचित जमाती मोर्चा कर्नाटक प्रदेश सचिव बसवराज हुंद्री, उत्तर मंडळ अध्यक्ष श्रीशैल यमकनमर्डी, दक्षिण मंडळ अध्यक्ष अप्पय्या जाजरी, कलगौडा पाटील तसेच बीएलए टीमचे सचिव राजेंद्र मठपती उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उत्तर मंडळ अध्यक्ष श्रीशैल यमकनमर्डी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. एसआयआर अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी समन्वयाने व संघटितपणे कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यानंतर मार्गदर्शन करताना डॉ. सोनाली सरनोबत यांनी विशेष मतदार यादी सघन पुनरावलोकन (एसआयआर) प्रक्रियेचे महत्त्व सविस्तरपणे विशद केले. बूथ लेव्हल एजंट (बीएलए) टीमच्या जबाबदाऱ्या, कार्यपद्धती तसेच मतदार यादी अचूक व अद्ययावत ठेवण्यात त्यांची भूमिका याबाबत त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पक्षाची खरी ताकद ही बूथस्तरावरील सक्षम संघटनात असून प्रत्येक कार्यकर्त्याने जबाबदारीची जाणीव ठेवून काम केल्यास पक्ष संघटना अधिक बळकट होईल, असे त्यांनी सांगितले.

बीएलए टीमचे सचिव राजेंद्र मठपती यांनी विधानसभा मतदारसंघात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने बूथस्तरावरील कार्यकर्त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. पक्षाच्या यशामागे कार्यकर्त्यांचे समर्पण आणि संघटनशक्ती हीच प्रमुख ताकद असून प्रत्येकाने सक्रिय सहभागातून संघटन विस्तारासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी बसवराज हुंद्री, अप्पय्या जाजरी यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनीही आपले मनोगत व्यक्त करून एसआयआर अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले.

मतदारसंघातील विविध भागांतील पदाधिकारी, बूथस्तरीय कार्यकर्ते तसेच पक्षाचे अनेक सक्रिय सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एसआयआर अभियान प्रभावीपणे राबवून यमकनमर्डी विधानसभा मतदारसंघातील पक्ष संघटना अधिक सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

शेवटी आभार प्रदर्शन करण्यात आले आणि राष्ट्रगीताने बैठकीची सांगता झाली.

About Belgaum Varta

Check Also

कुत्र्याचा जीव वाचवताना आईचा दुर्दैवी अंत; मुलासमोरच घडली हृदयद्रावक घटना

Spread the love  बेळगाव : रस्ता ओलांडणाऱ्या एका भटक्या कुत्र्याचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात एका आईला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *